CWG 2022 Live: शेवटचा दिवस भारतासाठी ठरला ‘गोल्डन डे’, फक्त हॉकीत निराशा
कॉमनवेल्थ गेम्स 2022 Live Score: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत 18 गोल्ड मेडल्स जमा झाले आहेत. भारत पदकतालिकेत 5 व्या स्थानावर आहे.
Commonwealth Games 2022 Live: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज 11 वा आणि शेवटचा दिवस आहे. भारताच्या खात्यात एकूण 18 गोल्ड मेडल जमा झाले आहेत. आज अजून पाच गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता आहे. पी.व्ही. सिंधु, लक्ष्य सेन, शरत कमल, हॉकी टीम आणि सात्विक-चिराग शेट्टीची जोडी गोल्ड जिंकण्यासाठी कोर्टवर उतरेल. भारत सध्या पदक तालिकेत 5 व्या स्थानावर आहे. भारत चौथं स्थान मिळवू शकतो.
LIVE NEWS & UPDATES
-
61 मेडल्ससह भारताचं अभियान संपलं
यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताचा प्रवास संपला आहे. यंदा भारताने एकूण 61 मेडल्स जिंकली. यात 22 गोल्ड, 16 रौप्य आणि 23 ब्राँझ मेडल आहेत. पदक तालिकेच चित्र काही वेळाने स्पष्ट होईल.
-
Hockey: फायनल मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव
भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 0-7 असा पराभव झाला. ऑस्ट्रेलिया सलग सातव्या चॅम्पियन बनला आहे. भारताला रौप्यपदकावर समाधान मानाव लागलं.
-
-
बॅडमिंटन: सात्विक-चिरागने भारताला मिळवून दिलं गोल्ड मेडल
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीने भारताला बॅडमिंटन मध्ये तिसरं गोल्ड मेडल मिळवून दिलं. भारतीय जोडीने 21-15, 21-13 असा सामना जिंकला.
-
भारताला दिवसातील तिसरं गोल्ड मेडल
भारताला आज दिवसातील तिसरं गोल्ड मेडल मिळालं आहे. अचंता शरत कमलने टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली.
-
हॉकी: हाफ टाइमपर्यंत भारताची खराब स्थिती
गोल्ड मेडलच्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच वर्चस्व आहे. हाफ टाइम पर्यंत भारतीय हॉकी संघ 5-0 असा पिछाडीवर आहे.
-
-
टेबल टेनिस: शरत कमल 2-1 ने पुढे
शरत कमलने पहिला गेम 11- 13 असा गमावला. पण त्यानंतर सलग दोन गेम जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली.
-
हॉकी: भारतीय टीम पिछाडीवर
भारतीय हॉकी टीम पिछाडीवर आहे. 22व्या मिनिटाल जेकब अँडरसनने गोल डागून ऑस्ट्रेलियाला 3-0 ची बढत मिळवून दिली.
-
बॅडमिंटन: भारतीय जोडीने पहिला गेम जिंकला
सात्विकसाई आणि चिरागच्या जोडीने 21- 15 असा पहिला गेम जिंकला. भारताच्या खात्यात आणखी एक गोल्ड मेडल जमा होण्याची शक्यता वाढली आहे.
-
टेबल टेनिस: शरत कमल गोल्डसाठी कोर्टवर उतरला
शरत कमल पुरुष एकेरीत गोल्ड मेडलसाठी कोर्टवर उतरला आहे. त्याच्यासमोर लियाम पिचफोर्डच आव्हान आहे.
-
हॉकी: ऑस्ट्रेलियाचे पहिल्य क्वार्टर मध्ये 2 गोल
ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टर मध्येच भारतावर दबाव बनवला आहे. पहिल्या क्वार्टर मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन गोल डागले.
-
लक्ष्य सेनची सुवर्णपदक विजेती कामगिरी
बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली.
#CommonwealthGames2022 | India’s Lakshya Sen wins gold in Badminton men’s single pic.twitter.com/M0q2dSdOOC
— ANI (@ANI) August 8, 2022
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये हॉकी फायनल सुरू
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये हॉकीचा अंतिम सामना सुरु झाला आहे. गोल्ड मेडलसाठी संघर्ष सुरु आहे.
-
टेबल टेनिस: जी साथियानला ब्राँझ मेडल
जी साथियानने ब्राँझ मेडल मिळवलं आहे. साथियानने इंग्लंडचा खेळाडू पॉल ड्रिंकहॉलला 7 गेम्स पर्यंत चाललेल्या सामन्यात 4-3 ने हरवलं.
-
लक्ष्य सेनची सुवर्णपदक विजेती कामगिरी
पी.व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनने भारतासाठी गोल्ड मेडल विजेती कामगिरी केली आहे. बॅडमिंटन मध्ये हे आजच्या दिवसातील दुसरं गोल्ड मेडल आहे. लक्ष्य सेनने फायनल मध्ये मलेशियाच्या एनजी त्झे योंग वर विजय मिळवला.
-
टेबल टेनिस: जी साथियानने 3 गेम जिंकले
जी साथियानने पहिला गेम 11-9, दूसरा गेम 11- 3 आणि तिसरा गेम 11- 5 असा जिंकला. चौथा गेम सुरु आहे.
-
बॅडमिंटन लक्ष्य सेन तिसऱ्या गेम मध्ये आघाडीवर
लक्ष्य सेन तिसऱ्या गेम मध्ये 11-7 असा आघाडीवर आहे. तो गोल्ड मेडलच्या जवळ आहे. पण यावेळी त्याला चूका टाळाव्या लागतील.
-
बॅडमिंटन: लक्ष्य सेनने दुसरा गेम जिंकला
लक्ष्य सेनने दुसऱ्या गेम मध्ये जबरदस्त कमबॅक केलं. त्याने 21-9 अशा मोठ्या फरकाने गेम जिंकला. हा सामना रोमांचक वळणावर आहे.
-
टेबल टेनिस: साथियानचा ब्राँझ मेडलसाठी संघर्ष
साथियान आणि इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल दरम्यान ब्राँझ मेडलचा सामना सुरु आहे.
-
बॅडमिंटन: लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला
अत्यंत निसटत्या फरकाने लक्ष्य सेनने 21- 19 असा पहिला गेम गमावला. लक्ष्य आणि यॉन्ग दरम्यान अटीतटीचा सामना सुरु आहे. गोल्ड जिंकण्यासाठी लक्ष्यला दुसऱ्या गेम मध्ये कामगिरी उंचावावी लागेल.
-
बॅडमिंटन: लक्ष्य सेनचा सामना सुरु
लक्ष्य सेनची नजरही गोल्ड मेडलवर आहे. सिंगल्स मध्ये त्याच्यासमोर मलेशियाच्या याँगचं आव्हान आहे. सामना सुरु झाला आहे. दोघांमध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे.
-
पी.व्ही. सिंधुने मिळवलं गोल्ड मेडल
पी.व्ही.सिंधुने 21-13 असा दुसरा गेम जिंकला. या विजयाबरोबर तिने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.
GOLD ? FOR INDIA ??
PV Sindhu beat Canada’s Michelle Li 21-15, 21-13 in the Women’s Singles FINAL ?#TeamIndia | #Cheer4India | #B2022 | #CWG2022 pic.twitter.com/lE364Tvcvl
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 8, 2022
-
पी.व्ही. सिंधुची दुसऱ्या गेम मध्ये आघाडी
पी.व्ही. सिंधुने दुसऱ्या गेम मध्ये आघाडी घेतली आहे. 11-6 अशी सिंधुकडे आघाडी आहे.
-
पी.व्ही.सिंधुने पहिला गेम जिंकला
सुरुवातीला मिशेल ली ने कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पी.व्ही.सिंधुने पहिला गेम 21-15 असा जिंकला.
-
पी.व्ही. सिंधुचा सामना सुरु
सिंधु आणि ली मध्ये गोल्ड मेडलसाठी सामना सुरु झाला आहे. 5-5 असा स्कोर बरोबरीत राहिल्यानंतर सिंधुने आघाडी घेतली. पण काही वेळातच पुन्हा 7-7 बरोबरी झाली.
-
फायनल आधी भारतीय हॉकी संघाला झटका
भारतीय टीमचा स्टार खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळणार नाही.
-
सेरेमनी नंतर सिंधुंचा सामना
बॅडमिंटन मिक्स्ड डब्ल्सची मेडेल सेरेमनी सुरु आहे. त्यानंतर सिंधुची फायनल मॅच सुरु होईल.
-
सांगली शहर परिसरासह जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस
सांगली शहर परिसरासह जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस
शहर ग्रामीण भागातील जनजीवन संपूर्ण विस्कळीत
ढगफुटी प्रमाणे आभाळातून कोसळत आहेत पावसाच्या मोठं मोठ्या सरी
सकाळ पासून पावसाची सलग जोरदार बॅटिंग
शहर उपनगर आणि ग्रामीण भागात पाणीच पाणी
कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या पायऱ्या वरून पाणी धबधबा प्रमाणे खाली पडताना दिसत आहे
सकाळ पासून सूर असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक झाले आहेत हैराण
मुसळधार पावसामुळे शहरात संपूर्णपणे वाहतूक व्यवस्था झाली विस्कळीत
-
वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये कालपासून पावसाची रिमझिम सुरूच
वसई विरार आणि मीरा भाईंदर मध्ये काल पासून पावसाची रिमझिम
रिमझिम पावसा सह अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी ही कोसळत आहेत.
आभाळ पूर्णपणे काळेकुट्ट झाले असून आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच राहण्याची शक्यता आहे
नालासोपारा पूर्व संयुक्त नगर परिसरातील दृश्य आहेत
-
पीव्ही सिंधूचा सामना थोड्याचवेळात
पीव्ही सिंधु आणि ली मिशेल दरम्यान बॅडमिंटन महिला सिंगल्स मध्ये गोल्ड मेडलचा सामना होणार आहे. दुपारी 1.20 मिनिटांनी सामना सुरु होईल.
-
CWG 2022 Live: कॉमनवेल्थ गेम्सचा आज शेवटचा दिवस
कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज 11वां आणि शेवटचा दिवस आहे. भारताच्या खात्यात आता 18 गोल्ड मेडल्स आहेत.
Published On - Aug 08,2022 12:58 PM