महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

महाराष्ट्र हे देशातील अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणूनही महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर देशाची आर्थिक राजधानी आहे. देशात क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी महाराष्ट्राची सीमा जोडलेली आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. राज्याची लोकसंख्या जवळपास 11 कोटी आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहेत. मात्र, महाराष्ट्रात विविध भाषाही बोलल्या जातात. देशातील सर्वच राज्याचे लोक महाराष्ट्रात राहतात. कला, संस्कृतीने संपन्न असलेला महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे महान राजे, सुधारक आणि स्वातंत्र्यवीर महाराष्ट्रातलेच. महाराष्ट्र ही शुरांची भूमी तशी संतांचीही भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, रामदास्वामी, संत चोखामेळा आदी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास मोठा आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. तर नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री होते. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर लोकसभेच्या 48 सीट आहे. उत्तर प्रदेशानंतर लोकसभेच्या सर्वाधिक सीट महाराष्ट्रात आहे. राज्यात सध्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून रमेश बैस हे राज्यपाल आहेत.

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Maharashtra Ahmednagar NILESH DNYANDEV LANKE - NCP (SP) Won
Maharashtra Osmanabad OMPRAKASH BHUPALSINH ALIAS PAVAN RAJENIMBALKAR - SHS (UBT) Won
Maharashtra Kalyan DR SHRIKANT EKNATH SHINDE - SS Won
Maharashtra Kolhapur CHHATRAPATI SHAHU SHAHAJI - INC Won
Maharashtra Gadchiroli-Chimur DR. KIRSAN NAMDEO - INC Won
Maharashtra Jalgaon SMITA WAGH - BJP Won
Maharashtra Jalna KALYAN VAIJINATHRAO KALE - INC Won
Maharashtra Dindori BHASKAR MURLIDHAR BHAGARE - NCP (SP) Won
Maharashtra Nashik RAJABHAU (PARAG) PRAKASH WAJE - SHS (UBT) Won
Maharashtra Nanded VASANTRAO BALWANTRAO CHAVAN - INC Won
Maharashtra Nandurbar ADV GOWAAL KAGADA PADAVI - INC Won
Maharashtra Beed BAJRANG MANOHAR SONWANE - NCP (SP) Won
Maharashtra Buldhana JADHAV PRATAPRAO GANPATRAO - SS Won
Maharashtra Bhandara-Gondiya DR. PRASHANT YADAORAO PADOLE - INC Won
Maharashtra Madha MOHITE-PATIL DHAIRYASHEEL RAJSINH - NCP (SP) Won
Maharashtra Mumbai North-West RAVINDRA DATTARAM WAIKAR - SS Won
Maharashtra Yavatmal-Washim SANJAY UTTAMRAO DESHMUKH - SHS (UBT) Won
Maharashtra Latur DR. KALGE SHIVAJI BANDAPPA - INC Won
Maharashtra Wardha AMAR SHARADRAO KALE - NCP (SP) Won
Maharashtra Sangli VISHAL (DADA) PRAKASHBAPU PATIL - IND Won
Maharashtra Hatkanangle DHAIRYASHEEL SAMBHAJIRAO MANE - SS Won
Maharashtra Aurangabad BHUMARE SANDIPANRAO ASARAM - SS Won
Maharashtra Palghar DR. HEMANT VISHNU SAVARA - BJP Won
Maharashtra Akola ANUP SANJAY DHOTRE - BJP Won
Maharashtra Bhiwandi SURESH GOPINATH MHATRE ALIAS BALYA MAMA - NCP (SP) Won
Maharashtra Nagpur NITIN GADKARI - BJP Won
Maharashtra Ramtek SHYAMKUMAR DAULAT BARVE - INC Won
Maharashtra Chandrapur DHANORKAR PRATIBHA SURESH ALIAS BALUBHAU - INC Won
Maharashtra Hingoli AASHTIKAR PATIL NAGESH BAPURAO - SHS (UBT) Won
Maharashtra Thane NARESH GANPAT MHASKE - SS Won
Maharashtra Mumbai North PIYUSH GOYAL - BJP Won
Maharashtra Mumbai North-Central GAIKWAD VARSHA EKNATH - INC Won
Maharashtra Raigad TATKARE SUNIL DATTATREY - NCP Won
Maharashtra Maval SHRIRANG APPA CHANDU BARNE - SS Won
Maharashtra Pune MURLIDHAR MOHOL - BJP Won
Maharashtra Shirur DR AMOL RAMSING KOLHE - NCP (SP) Won
Maharashtra Satara UDAYANRAJE BHOSALE - BJP Won
Maharashtra Solapur PRANITI SUSHILKUMAR SHINDE - INC Won
Maharashtra Raver KHADSE RAKSHA NIKHIL - BJP Won
Maharashtra Shirdi BHAUSAHEB RAJARAM WAKCHAURE - SHS (UBT) Won
Maharashtra Mumbai South-Central ANIL YESHWANT DESAI - SHS (UBT) Won
Maharashtra Ratnagiri-Sindhudurg NARAYAN TATU RANE - BJP Won
Maharashtra Dhule BACHHAV SHOBHA DINESH - INC Won
Maharashtra Mumbai North-East SANJAY DINA PATIL - SHS (UBT) Won
Maharashtra Baramati SUPRIYA SULE - NCP (SP) Won
Maharashtra Mumbai South ARVIND GANPAT SAWANT - SHS (UBT) Won
Maharashtra Amravati BALWANT BASWANT WANKHADE - INC Won
Maharashtra Parbhani JADHAV SANJAY ( BANDU ) HARIBHAU - SHS (UBT) Won

महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे. महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार 800 किलो मीटर आहे. तर दक्षिणोत्तर विस्तार 700 किलोमीटर आहे. राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर हे समुद्र किनारा लाभलेले जिल्हे आहेत. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश आहे. पण राज्यात देशातील बहुतेक सर्वच भाषा बोलणारे लोक राहतात. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी म्हणजे 1960मध्ये राज्याची लोकसंख्या 4 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या 11 कोटी झाली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेही महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. 

महाराष्ट्राला लागूनच गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक या सहा राज्यांसह दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर 535 शहरे आहेत. राज्यात 358 तालुके आहेत. तसेच 43 हजार 665 खेडी आहेत. राज्यात अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे. तर मुंबई सर्वात छोटा जिल्हा आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर नागपूर ही उपराजधानी आहे. 

राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. तर राज्यसभेच्या 19 जागा आहेत. विधानसभेच्या 288 जागा असून विधान परिषदेच्या 78 जागा आहेत. मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो.


प्रश्न - महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार आहे?
उत्तर - महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीचं सरकार आहे. 

प्रश्न - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे?
उत्तर - एकनाथ शिंदे

प्रश्न - महाराष्ट्रात किती उपमुख्यमंत्री आहेत? त्यांची नावे काय?
उत्तर - राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. 

प्रश्न - महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?
उत्तर- राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत.

प्रश्न - 2019 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून कोण जिंकलं होतं?
उत्तर - भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले होते.

प्रश्न - नितीन गडकरी किती मतांच्या फरकाने जिंकले होते?
उत्तर - नितीन गडकरी हे 2,16,009 मतांच्या फरकाने जिंकले होते.

प्रश्न - 2014मध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
उत्तर - 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला 23, शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला चार, काँग्रेसला दोन आणि स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळाली होती.

प्रश्न - महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
उत्तर- महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली

प्रश्न - महाराष्ट्र विधानसभेत किती जागा आहेत?
उत्तर - 288