Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Watch Video

Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Watch Video

| Updated on: Jul 29, 2024 | 11:16 AM

VIDEO | जिप्सीचे दर परवडणारे नसल्याने अनेक पर्यटक बस सारख्या कॅन्टरने सफारी करतात, मात्र आता ताडोबामध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता अल्पदरात करता येणार जंगल सफारी

चंद्रपूर, २९ ऑगस्ट २०२३ | चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी नव्या क्रुजर वाहनाची निर्मिती केली गेली आहे. सध्याच्या जिप्सीचे दर परवडणारे नसल्याने अनेक पर्यटक बस सारख्या कॅन्टरने सफारी करतात. कॅन्टरमध्ये प्रतिव्यक्ती 500 रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिकदृष्ट्या हे किफायतशीर आहे. मात्र कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने प्रकल्पाच्या आत चिंचोळ्या रस्त्याची पूर्ण जागा व्यापतात. सोबतच कॅन्टरचा आवाज पण जास्त असल्याने गाडीची चाहुल लागताच प्राणी पळून जातात आणि वन्यप्राणी जवळून पाहता येत नाही. त्यामुळे ताडोबा प्रशासनाने आता 9 पर्यटक बसू शकतील अशा ६ विशेष जिप्सी विकत घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे या जिप्सीने सफारी करण्यासाठी अतिशय कमी, अल्प दर आकारण्यात येणार आहे. ताडोबा कोर झोनचा पुढील हंगाम म्हणजे 1 ऑक्टोबरपासून या जिप्सी पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्याचा ताडोबा प्रशासनाचा विचार आहे.

Published on: Aug 29, 2023 06:12 PM