विधानसभा निवडणूक 2024 - उमेदवारांची यादी

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात एका टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 81 जागांसाठी झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणरा आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी 43 जागांवर तर 20 नोव्हेंबर रोजी 38 जागांवर मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमधील मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. महाराष्ट्रात दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ही लढत होणार आहे. काही ठिकाणी राज्यात तिरंगी आणि चौरंगी लढतही पाहायला मिळणार आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी आणि चौरंगी लढत होणार आहे. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीवेळीच राज्यात कुणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

प्रमुुख उमेदवारांची यादी 2024

राज्य जागा उमेदवार पक्ष
Maharashtra Achalpur BACCHU B. KADU Prahar Janshakti Party