बारामतीनंतर भाजपची शिरुर मतदारसंघात मोर्चेबांधणी, अमोल कोल्हे यांना कोण देणार टक्कर?

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील इतर पक्षाकडे असलेल्या जागांवर भाजपकडून चाचपणी सुरु आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बारामतीनंतर भाजपची शिरुर मतदारसंघात मोर्चेबांधणी, अमोल कोल्हे यांना कोण देणार टक्कर?
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 9:40 PM

सुनिल थिगळे, शिरुर : भाजपने बारामतीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महेश लांडगे यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि शिंदे गटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपलं अस्तित्व टिकवणं अवघड जाणार आहे.

सध्या शिंदे गटात असलेले आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडी असल्याने तसेच शिरुरच्या जागेवर विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिरूरची जागा अमोल कोल्हे यांना सोडणार असल्याची चर्चा होती. याच कारणास्तव आढळराव पाटलांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली. मात्र भाजपने शिरूर मतदारसंघ काबीज करण्याचा प्लॅन आखून आढळरावांना धक्का दिला आहे.लोकसभा निवडणुकीला आणखी एक वर्षांचा अवधी असला तरी भाजपने रणमैदानाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे.अनेक केंद्रीय मंत्रांचे दौरे शिरूर मतदार संघात झाले आणि शिरूर मध्ये भाजपचा झेंडा रोवला जावा यासाठी प्रयत्न ही सुरू केलेले पाहायला मिळतंय आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या बालेकिल्ल्यात पक्षाची मोठी ताकद असतानाही लोकसभेला उमेदवार विजयी होत नाही, याची सल राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना होती. त्यामुळे विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या आढळराव-पाटील यांना शह देण्यासाठी त्यांच्याच पक्षातील डॉ. अमोल कोल्हे या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्याला राष्ट्रवादीने आपल्या पक्षात आणले. अतिशय चुरशीच्या लढतीत अंतिमतः राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर एकदाचा ताबा मिळवला.

ज्यावेळी शिवसेना -भाजप युती सरकारची स्थापना करण्यात आली त्यावेळी ज्या ठिकाणी भाजपा ज्या जागा आहे त्याठिकाणी भाजपा ला आणि ज्या ठिकाणी शिवसेना च्या जागा आहे त्या ठिकाणी शिवसेनेला जागा सोडायच्या असा शब्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या नंतर आढळराव यांनी शिवसेना आणि भाजप मध्ये चांगल्या प्रकारे गटबंधन सुरू केले आहे. शेवटी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य राहणार असल्याचे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षनी सांगितले आहे.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळाले तर आनंदच आहे मात्र ही जागा शिवसेनेला गेली तर आम्ही शिवसेनेचं काम तितक्याच ताकतीने काम करु असं भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष जागृती महाजन यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशातील लोसभेवर लक्ष केंद्रित करत आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केव्हा निवडणूक लढविली नाही त्याठिकाणी कमळ फुलविण्याचे संकेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी शिरूर लोकसभेत पत्रकार परिषद घेवून दिले.

यातच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर झळकले आणि शरद पवार यांनी पुन्हा अमोल कोल्हे हेच उमेदवार राहतील असे जाहीर करत विलास लांडे यांना शह दिला. आगामी लढाई पुन्हा आढळराव पाटील विरुद्ध डॉ. कोल्हे अशी रंगणार असे अपेक्षित असतानाच भाजपनेही या मतदारसंघावर फासे फेकले. आता महेश लांडगे यांनी ही लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त करत आम्हीही तयारीत आहोत, असा इशारा राष्ट्रवादीसोबत मित्रपक्षालाही दिला. या मतदारसंघातून दिल्ली गाठण्याचे स्वप्न पाहण्याचे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे सहमती दर्शवली यामुळे शिरूर मतदारसंघातील रंगत वाढली आहे.

भाजपने शिरूरवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात कधीही काहीही घडामोडी घडू शकतात आणि त्याचा प्रभाव शिरूरमध्ये जाणवणार आहे. त्यामुळे भाजपची मिशन 2024 तयारी सुरू करत भाजपने लढाईची तयारी केली असतानाच आता महेश लांडगे यांनी शिरूर मतदारसंघात भाजपने उमेदवारी दिली तर नक्कीच रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.