नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक दिलासा, काय कारण?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 14 ऑगस्ट रोजी यांना जामीन मिळाला होता, त्यानंतर आता सत्र न्यायालयाकडून आणखी दिलासा, हमीदार सादर करण्यासाठी सत्र न्यायालयाकडून नवाब मलिक मिळाली एक महिन्याची वाढीव मुदत
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हमीदार सादर करण्यासाठी न्यायालयाकडून नवाब मलिक यांना वाढीव एक महिन्यांची मुदत मिळाली आहे. 14 ऑगस्ट रोजी नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. दोन महिन्यांसाठी ते जामीनावर आहेत. त्यानंतर आता त्यांना सत्र न्यायालयाकडून आणखी मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणात प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने अटक केली होती.