Paris Olympics 2024 Schedule
फोटो
आणखी पाहाव्हिडीओ
आणखी पाहापॅरिस ऑलिम्पिकचं आयोजन हे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 200 पेक्षा अधिक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांचे 329 इव्हेंट्स होणार आहेत. ऑलिम्पिकमधील 28 प्रमुख खेळांव्यतिरिक्त यंदा बार ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लायंबिंग या खेळांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये एकूण 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताच्या अॅथेलिटिक्स टीममध्ये सर्वाधिक 29 खेळाडू आहेत. तसेच शुटिंगमध्ये 21 आणि हॉकी टीममध्ये 19 खेळाडूंचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 वेळापत्र संबंधित प्रश्न-उत्तरे
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा श्रीगणेशा हा 26 जुलैपासून होणार आहे. तर 11 ऑगस्टपर्यंत स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ओपनिंग सेरेमनी केव्हा?
उत्तर – पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ओपनिंग सेरेमनीला 26 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 54 मिनिटांनी सुरुवात होईल.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला 24 जुलैपासून सुरुवात होणार आहे. सर्वात आधी फुटबॉलचे सामने होणार आहेत.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय स्पर्धक केव्हा उतरणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाच्या आर्चरी सामन्याला 25 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती खेळ होणार?
उत्तर- प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 32 खेळ असणार आहेत. यामध्ये पहिल्यांदाच ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लायंबिंगचा समावेश करण्यात आला आहे.