लोकसभा निवडणूक रॅली तपशील 2024
जे.पी.नड्डा हे हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत. 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जे.पी.नड्डा यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डा यांचा जन्म आणि शिक्षण पाटणा येथे झालं आहे. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशात स्थायिक झाले. हिमाचल प्रदेशातील विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. नड्डा यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, तेलंगाणा, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यांसह अनेक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केले आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचेही सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी गुजरातचे भाजप नेते गोवर्धन झडपिया यांच्यासोबत नड्डा यांनी चांगली कामगिरी केली. यामुळे उत्तरप्रदेशात पक्षाला 50 टक्के मतं आणि 64 जागा मिळाल्या होत्या.
Date | City | State |
---|---|---|
16-Apr-2024 | पुणे | Maharashtra |
अमित शाह यांचा जन्म मुंबईत 22 ऑक्टोबर 1964 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत गुजरातमधील मानसा या गावी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झालं. अमित शाह यांच्यावर त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव होता. त्यांची आई गांधीवादी होत्या. आईकडूनच त्यांना खादी परिधान करण्याची प्रेरणा मिळाली. 1977 मध्ये मेहसाणआ लोकसभा निवडणुकीत जनसंघाच्या तिकीटावर सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या मणिबेन पटेल उभ्या होत्या. त्यावेळी शाह यांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं. या वयात त्यांनी मणिबेन पटेल यांचा प्रचार केला होता.
80च्या दशकातच अमित शाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. नंतर भाजपच्या युवा मोर्चात त्यांनी काम सुरू केलं. लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी अमित शाह यांच्याकडेच असायची. 1997 मध्ये अमित शाह हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. त्याच वर्षी गुजरातच्या सरखेज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अमित शाह उभे राहिले आणि विजयी झाले. इथून त्यांचा संसदीय राजकारणाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. 2010 पर्यंत ते गुजरातच्या विधानसभेत होते. त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. भाजपचे चाणक्य म्हणूनही त्यांची ओळख आहे.
नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री आहेत. गडकरी हे मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्मही नागपूरचाच. एम कॉम, एलएलबीपर्यंत त्यांचं शिक्षण झालंय. गडकरी यांना तीन मुलं आहेत. विद्यार्थी दशेपासूनच गडकरी हे विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले. 1995मध्ये शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी आली होती. मंत्री असताना त्यांनी राज्यातील पूल बांधणीवर जोर दिला होता. त्यामुळे गडकरी अधिक चर्चेत आले.
1989मध्ये ते पहिल्यांदाच विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यापूर्वी 1983च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. 20 वर्षाच्या विधानपरिषदेच्या काळात त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं होतं.
Date | City | State |
---|---|---|
11-May-2024 | पुणे | Maharashtra |
03-May-2024 | बीड | Maharashtra |
08-Apr-2024 | नागपूर | Maharashtra |
रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपद भूषविलं होतं. आठवले यांच्या पक्षाची भाजपसोबत युती आहे. आठवले हे दलित पँथरच्या चळवळीतून पुढे आले आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार चळवळीत त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे.
Date | City | State |
---|---|---|
11-May-2024 | शिर्डी | Maharashtra |
03-May-2024 | बारामती | Maharashtra |
19-Apr-2024 | बारामती | Maharashtra |
उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आहेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. तसेच त्यांच्या हातातून पक्षही गेला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता दिली आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह मशाल आहे.
Date | City | State |
---|---|---|
05-May-2024 | बारामती | Maharashtra |
03-May-2024 | सांगली | Maharashtra |
17-Apr-2024 | जळगाव | Maharashtra |
राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत. 2004मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यशही मिळालं होतं.
Date | City | State |
---|---|---|
11-May-2024 | नंदूरबार | Maharashtra |
20-Apr-2024 | नांदेड | Maharashtra |
17-Apr-2024 | मुंबई | Maharashtra |
14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पार्टीची स्थापना करण्यात आली. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून बसपाची स्थापना करण्यात आली. कांशीराम हे बसपाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या निधानानंतर मायावती यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली. बसपा ही राष्ट्रीय पार्टी आहे. उत्तर प्रदेशात बसपाने स्वबळावर सत्ताही स्थापन केली होती. मायावती यांनी 2001मध्ये त्यांचा उत्तराधिकारी घोषित केला आहे. त्यांच्या भाच्यालाच त्यांनी उत्तराधिकारी घोषित केलं आहे.
Date | City | State |
---|---|---|
08-May-2024 | नागपूर | Maharashtra |
देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. 28 डिसेंबर 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला 72 समाजसुधारक, पत्रकार आणि वकील उपस्थित होते. त्यानंतर हळूहळू काँग्रेस वाढत गेली. महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आदी असंख्य बडे नेते आणि स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस पक्षासोबत होते. देशाला स्वातंत्र्य करण्यात काँग्रेसची मोठी भूमिका होती.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आली आणि पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. निधन होईपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत नेहरू पंतप्रधानपदी होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे दुसरे पंतप्रधान बनले. त्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी तीनवेळा पंतप्रधान झाल्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी पंतप्रधान झाले. 1991च्या निवडणूक प्रचारावेळी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.
देशाला सर्वाधिक पंतप्रधान देण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे. 1990नंतर पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग सलग दहा वर्ष पंतप्रधानपदी होते. मात्र, अनेक दशके सत्तेत राहिल्या काँग्रेसची परिस्थिती 2014नंतर वाईट झाली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 44 जागा मिळाल्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली. काँग्रेसला 52 जागा मिळाल्या. अनेक राज्यांमधून याच काळात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीतून पराभूतही व्हावं लागलं होतं.
Date | City | State |
---|---|---|
17-Apr-2024 | अकोला | Maharashtra |
10 जून 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना राष्ट्रवादीची स्थापना केली होती. राष्ट्रवादी हा राज्यस्तरीय पक्ष आहे. या पक्षाचा जनाधार महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशातील काही भागातही राष्ट्रवादीला चांगला जनाधार आहे. 2023मध्ये राष्ट्रवादीत दोन गट पडले. शरद पवार गट आणि अजित पवार गट. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजितदादा गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाचं चिन्ह तुतारी आहे.
Date | City | State |
---|---|---|
04-May-2024 | सातारा | Maharashtra |
24-Apr-2024 | शिरूर | Maharashtra |
देशातील दोन प्रमुख पक्षांपैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे. भाजप 2014पासून केंद्रातील सत्तेत आहे. 21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाच्या नावाने या पक्षाची सुरुवात झाली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. 1951-52मध्ये झालेल्या देशातील पहिल्या निवडणुकीत संघाने भाग घेतला होता. यावेळी पक्षाला तीन जागांवर विजय मिळाला होता. 1977मध्ये जनसंघाने इतर पक्षांशी युती केली. यावेळी जनता पार्टीची स्थापना करणअयात आली. जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने द्विसदस्य प्रणालीला बंदी घातली. त्यामुळे अनेक लोकांनी पार्टी सोडली. कारण जनसंघ जनता पार्टीचाही सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचाही.
6 एप्रिल 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावाने नवीन पक्ष स्थापन करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी बीजेपीचे पहिले संस्थापक अध्यक्ष बनले. 1980 मध्ये भाजपला त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळाला. 2014मध्ये भाजपने संपूर्ण बहुमत मिळवलं. भाजपला 282 जागांवर विजय मिळाला. तर 2019मध्ये 303 जागांवर विजय मिळाला.
1990च्या दशकात अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात राम मंदिराचं आंदोलन सुरू करण्यात आलं. त्यामुळे जनसामान्यात भाजपचा जम बसला. भाजपला 100 हून अधिक जागांवर विजय मिळवता आला. हळूहळू पक्ष बहुमताकडे आला. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. भाजपमधून पहिले पंतप्रधान होण्याचा मान वाजपेयींना मिळाला. पहिल्यांदा ते 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले. बहुमत न मिळाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. 1998मध्ये दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. एक वर्षानंतर 1999मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए पहिल्यांदा बहुमतासह सत्तेत आला. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. वाजपेयी सरकारमध्ये आडवाणी उपपंतप्रधान होते.
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या बळावर बहुमत मिळवलं. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला 336 जागा मिळाल्या. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. 2019मध्येही भाजपला मोठा विजय मिळाला. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. 2019मध्ये भाजपला 303 तरा एनडीएला 350 जागा मिळाल्या होत्या. सलग दहा वर्ष पंतप्रधानपदी असलेले मोदी हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत.
Date | City | State |
---|---|---|
18-May-2024 | मुंबई | Maharashtra |
11-May-2024 | बीड | Maharashtra |
23-Apr-2024 | बारामती | Maharashtra |
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत 2022मध्ये आजवरचं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी पक्षात बंड करून आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांना पक्षाचे काही खासदार येऊन मिळाले. त्यानंतर शिवसेनेचा वाद कोर्ट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे गेला. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता दिली आहे. शिवसेनेला प्रादेशिक पक्षाची मान्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं चिन्ह मशाल आहे.
Date | City | State |
---|---|---|
11-May-2024 | संभाजी नगर | Maharashtra |
05-May-2024 | सांगली | Maharashtra |
27-Apr-2024 | मुंबई | Maharashtra |