Rank | Country | ||||
---|---|---|---|---|---|
71 | IND | 0 | 1 | 5 | 6 |
1 | USA | 40 | 44 | 42 | 126 |
2 | CHN | 40 | 27 | 24 | 91 |
3 | JPN | 20 | 12 | 13 | 45 |
4 | AUS | 18 | 19 | 16 | 53 |
5 | FRA | 16 | 26 | 22 | 64 |
6 | NED | 15 | 7 | 12 | 34 |
Indian in Olympic/Paris
India’s medal History
फोटो
आणखी पाहाव्हिडीओ
आणखी पाहाफ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 33 व्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जुलै 26 ते 11 ऑगस्ट दरम्यान या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर पॅरिसला ऑलिम्पिकच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. पॅरिसमध्ये याआधी 1900 आणि 1924 साली आयोजन करण्यात आलं होतं. लंडननंतर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 329 इव्ंहेट्स होणार आहेत. तसेच एकूण 19 दिवस 32 खेळ होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 10 हजार 500 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 81 हजार कोटी रुपयांचा खर्च होणं अपेक्षित आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित प्रश्न-उत्तरे
प्रश्न- ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे?
उत्तर- ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात आलं आहे. पॅरिस व्यतिरिक्त फ्रान्समधील विविध 16 शहरांमध्ये इवेंट्स आयोजित केले आहेत.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा थरार 11 ऑगस्टपर्यंत रंगणार आहे.
प्रश्न- पॅरिसमध्ये याआधी ऑलिम्पिकचं आयोजन केव्हा करण्यात आलं होतं?
उत्तर- पॅरिसमध्ये याआधी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे 1900 आणि 1924 साली करण्यात आलं होतं.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती इव्हेंट्स होणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांमधील 329 इव्हेंट्स होणार आहेत. या खेळांमध्ये तब्बल 10 हजार 500 खेळाडू सहभागी होणार आहेत.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं बजेट किती?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं बजेट हे 60 हजार कोटी रुपये इतकं असल्याचं म्हटलं जात आहे.