महाराष्ट्र (Maharashtra Lok Sabha Constituencies)

देशात एकूण सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी तर 20 मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल येत्या 4 जून रोजी होणार आहे. त्यानंतरच देशाच्या संसदेचं चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, भाजप नेते अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापासून ते उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. आरोपप्रत्योरापांपासून ते आश्वासनांची खैरातही या रणधुमाळीत पाहायला मिळणार आहे.

Maharashtra प्रमुुख उमेदवारांची यादी 2024

उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असून महाराष्ट्रातही नेहमी राजकीय घडामोडी घडत असतात. राज्याच्या राजकारणात कधीकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दबदबा होता. परंतु, आता शिवसेनेची जागा भारतीय जनता पार्टीने घेतली असून राज्यात बीजेपीने मजबूत पाय रोवले आहेत. महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आहे. एकनाथ शिंदे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. 

एकनाथ शिंदे पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, नंतर त्यांनी पक्षात बंड केलं आणि काही आमदारांनासोबत घेऊन शिवसेना (शिंदे गट) नावाने वेगळा पक्ष स्थापन केला. तसेच भाजपच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केलं.

महाराष्ट्राची भूमी ही महान स्वातंत्र्य सैनिकांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या सारख्या महान नेत्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात रणशिंग फुंकले. 1960 पूर्वी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यात आली होती. मात्र, संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. त्याला यश आलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. स्वतंत्र गुजरात राज्याचीही निर्मिती करण्यात आली. 1960मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य उत्तर पश्चिमेलागुजरातपासून, उत्तरेला मध्यप्रदेशापासून, दक्षिण पूर्वेला तेलंगणापर्यंत, दक्षिणेत कर्नाटक, पूर्वेला छत्तीसगडपासून ते दक्षिण पश्चिमेला गोव्यापर्यंत घेरलेलं आहे. प्रशासकीय सुविधेसाठी राज्यात 36 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.


प्रश्न - महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार आहे?
उत्तर - महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीचं सरकार आहे. 

प्रश्न - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे?
उत्तर - एकनाथ शिंदे

प्रश्न - महाराष्ट्रात किती उपमुख्यमंत्री आहेत? त्यांची नावे काय?
उत्तर - राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. 

प्रश्न - महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?
उत्तर- राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत.

प्रश्न - 2019 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून कोण जिंकलं होतं?
उत्तर - भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले होते.

प्रश्न - नितीन गडकरी किती मतांच्या फरकाने जिंकले होते?
उत्तर - नितीन गडकरी हे 2,16,009 मतांच्या फरकाने जिंकले होते.

प्रश्न - 2014मध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
उत्तर - 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला 23, शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला चार, काँग्रेसला दोन आणि स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळाली होती.

प्रश्न - महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
उत्तर- महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली

प्रश्न - महाराष्ट्र विधानसभेत किती जागा आहेत?
उत्तर - 288