देशातील राजकीय पक्ष (लोकसभा निवडणूक निकाल 2024 Party Wise Vote Counting)

स्वातंत्र्यानंतर 1951-52मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी देशातील राष्ट्रीय पक्षांची संख्या 14 होती. परंतु, आता 2024च्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांची संख्या केवळ 6 झाली आहे. त्यात काँग्रेस आणि सीपीआय हे दोन आजही पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत. या दोन्ही पक्षांनी आतापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत.

National Party (राष्ट्रीय पार्टी)

स्वातंत्र्यानंतर 1951-52मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी देशातील राष्ट्रीय पक्षांची संख्या 14 होती. परंतु, आता 2024च्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांची संख्या केवळ 6 झाली आहे. त्यात काँग्रेस आणि सीपीआय हे दोन आजही पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत. या दोन्ही पक्षांनी आतापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. 

राष्ट्रीय पार्टी

देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत 6 राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा मिळाला आहे. भाजप, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), बहुजन समाज पार्टी, नॅशनल पिपुल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी या पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा मिळालेला आहे. यात बसपा वगळल्यास सर्वच राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या आघाडी आणि युतीचा भाग आहेत. आम आदमी पार्टीला 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. 

राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांचा दर्जा देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या 1968च्या नियमांचं पालन केलं जातं. या नुसार कोणत्याही राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यातील लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक लढायला हवी. त्याचबरोबर या निवडणुकीत त्या पक्षांना कमीत कमी सहा टक्के मतदान मिळवणं आवश्यक असतं. 

एवढेच नव्हे तर त्या पक्षाचे कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात चार खासदार निवडून आले पाहिजे, किंवा कमीत कमी चार राज्यात प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळायला हवी. किंवा पक्षाने लोकसभेच्या एकूण जागांपैकी कमीत कमी दोन टक्के जागा जिंकायला हव्यात. तसेच त्यांच्या उमेदवारांना तीन राज्यात विजय मिळायला हवा. 
 

Party Name Party Logo Won/Leading Party President Party Establishment Year
Bharatiya Janata Party JP Nadda April 1980
Indian National Congress Mallikarjun Kharge December 1885
Aam Aadmi Party Arvind Kejriwal November 2012
Bahujan Samaj Party Mayawati April 1984
Regional Party (प्रादेक्षिक पक्ष)

निवडणूक आयोगाकडून एखाद्या पक्षाला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा दिला जातो. मात्र, त्यासाठी राजकीय पक्षांनाही अनेक निकष पूर्ण करावे लागतात. राष्ट्रीय पक्षांसाठी अनेक वेगवेगळे नियम आहेत, तर राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. खाली नमूद केलेल्या कोणत्याही अटींची पूर्तता झाल्यास त्याला राज्य पक्षाचा दर्जा प्राप्त होतो.

राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी, राजकीय पक्षाला संबंधित राज्यात एकूण वैध मतांपैकी 6 टक्के मते मिळवावी लागतात. तसेच त्याच राज्यातील विधानसभेत किमान 2 जागा जिंकणे त्याच्यासाठी आवश्यक आहे.

किंवा एखाद्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत संबंधित राज्यात एकूण वैध मतांपैकी 6 टक्के मते मिळाली आणि त्याच राज्यातून लोकसभेची जागा जिंकली.

किंवा मान्यता मिळविण्यासाठी, राजकीय पक्षाला संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 3 टक्के जागा जिंकाव्या लागतील किंवा विधानसभेच्या 3 जागा जिंकाव्या लागतील (जे जास्त असेल).

किंवा संबंधित राज्य लोकसभेच्या प्रत्येक 25 जागांसाठी राज्याला किंवा त्याच्या कोणत्याही भागासाठी संसदीय निवडणुकीत एक जागा जिंकल्यास.

किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संबंधित राज्यात एकूण वैध मतांपैकी 8 टक्के मते मिळाल्यास.


 

Party Name Party Logo Won/Leading Party President Party Establishment Year
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar June 2023
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) Uddhav Thackeray June 2022

कोणत्याही निवडणुकीत राजकीय पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असते. बहुतांश निवडणुकांमध्ये मुख्य लढत राजकीय पक्षांनी उभे केलेल्या उमेदवारांमध्येच होते. मात्र, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारही मोठा बदल घडवून आणतात. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे आणि भारताच्या संसदीय इतिहासात सर्वाधिक निवडणुका जिंकून सत्तेवर येण्याचा बहुमान काँग्रेसकडे आहे.

भारतीय जनता पार्टी (भाजप), काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पार्टी-एम, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उतरले होते. निवडणुकीत या 7 राष्ट्रीय पक्षांनी एकूण 1454 उमेदवार उभे केले होते. परंतु त्यापैकी केवळ 397 विजयी झाले. तर 670 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

सध्या देशात 6 राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. या सार्वत्रिक निवडणुकीत सहा राष्ट्रीय पक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस (INC), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPIM), बहुजन समाज पार्टी (BSP), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांचा समावेश आहे. यामध्ये बसपा वगळता सर्व पक्ष कोणत्या ना कोणत्या आघाडीचा भाग आहेत. 2023 मध्ये AAP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. 

पहिल्या निवडणुकीत किती राष्ट्रीय पक्ष

देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल सांगायचे झाल्यास, 1951-52 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासह 14 राष्ट्रीय पक्षांनी भाग घेतला होता. यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेसने 499 पैकी 364 जागा जिंकल्या. भारतीय कम्युनिस्ट पार्टी 16 जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर होता. तर काँग्रेसनंतर अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक विजय मिळवला होता. तेव्हा 37 अपक्ष उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. सोशालिस्ट पार्टीला 12 जागा मिळाल्या आणि तो तिसरा सर्वात यशस्वी पक्ष ठरला.

देशाच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा मानही काँग्रेसला मिळाला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 400 हून अधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 415 जागांवर विजय मिळवला होता, तर त्यापाठोपाठ अविभाजित आंध्र प्रदेशातील तेलुगू देसमने 34 जागांवर निवडणूक लढवून 30 जागांवर विजय मिळवला होता. सीपीआयने 22 जागा जिंकल्या होत्या. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पहिल्यांदाच निवडणूक लढवत आपले खाते उघडले होते.

भाजपने 2 जागा जिंकल्या. यापैकी एका जागेवर, आंध्र प्रदेशच्या हनमकोंडा लोकसभा मतदारसंघात भाजपने तत्कालीन गृहमंत्री आणि भावी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचा पराभव केला होता. काँग्रेसने इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला तेव्हा हा पराभव झाला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 600 हून अधिक राजकीय पक्षांनी आपले नशीब आजमावले होते. पण काही पक्षच जिंकले. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लढणाऱ्या राष्ट्रीय पक्षांची संख्या 7 होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 303 जागा जिंकल्या तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला (सीपीआय) किमान 2 जागांवर समाधान मानावे लागले. मोठी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पक्षांचे 1454 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी केवळ 670 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.