T20 WC 2024 : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार?
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 15 मुख्य आणि 4 राखीव अशा एकूण 19 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियासह कोचिंग स्टाफ, फिजीओ आणि इतर संबंधित टीमही सोबत असणार आहे. मात्र हे सर्व एकत्र जाणार नसल्याचं समोर आलं आहे. टीम इंडिया एकूण 2 तुकड्यांमध्ये रवाना होणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची पहिली तुकडी […]
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 15 मुख्य आणि 4 राखीव अशा एकूण 19 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियासह कोचिंग स्टाफ, फिजीओ आणि इतर संबंधित टीमही सोबत असणार आहे. मात्र हे सर्व एकत्र जाणार नसल्याचं समोर आलं आहे. टीम इंडिया एकूण 2 तुकड्यांमध्ये रवाना होणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची पहिली तुकडी ही 25 मे रोजी रवाना होणार आहे. तर दुसरी तुकडी 26 मे रोजी उड्डाण भरणार आहे. याच 26 मे रोजी आयपीएलमधील अंतिम सामना होणार आहे.
टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करण्याआधी एकूण 2 सराव सामने खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे सामने फ्लोरिडा येथे होणार असल्याची माहिती आहे. तर त्यानंतर टीम इंडिया आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जूनपासून आयर्लंड विरुद्ध करेल. त्यानंतर टीम इंडिया पुढील सामना हा 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. तिसऱ्या सामन्यात 12 जून रोजी यजमान यूएसएचं आव्हान असणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना हा कॅनेडा विरुद्ध होणार आहे.