आशिया कप 2023 तोंडावर आला असताना टीमच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. टीमचा मोठा प्लेअर स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

आशिया सुरू होण्याआधी बांगलादेश संघाचा आक्रमक सलामीवीर लिटन दास आजारी पडला आहे. बांगलादेशचा लिटन दास हा स्टार खेळाडू असून अचानक त्याची तब्येत बिघडल्याने संघाची चिंता वाढली आहे.

लिटन दास आजारी असल्यामुळे रविवारी श्रीलंकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तो टीमसोबत बसू शकला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

बांगलादेशचा पहिला सामना 31 ऑगस्टला श्रीलंकेसोबत होणार आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 2 ऑगस्टला होणार आहे.