सिंधुदुर्गात अतिवृष्टीतील नुकसान ग्रस्तांना १९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
जुलैमध्ये अतिवृष्टी होऊन पुरस्थिती निर्माण झाल्याने मनुष्यहानी, कच्ची घरे,गोठे, झोपड्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले.
या नुकसानीपोटी आतापर्यंत १९ लाख २१ हजार ९५ रुपये एवढ्या निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
दोघांचा वाहून मृत्यू झाला आहे तसेच ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे.एक पूर्णतः पक्के घर व तीन पूर्णतः कच्ची घरे कोसळली आहेत.
कच्च्या घरांची पडझड, तीन झोपड्या, ३४ गोठे आणि एका पोल्ट्रीची पडझड होऊन ७५ लाखांहून अधिक एकूण नुकसान झाले आहे.