हल्ली तरुणांना लग्न जुळवण्यात समस्या येत असल्याने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं फावलं आहे. लग्नासाठी मुलगी दाखवून तरुणांची फसवणूक होत आहे.
राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जीआरच्या नावाखाली अधिकाऱ्यांना योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण देता आली नाहीत.
राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प हा येवला तालुक्यातील अंदूरसुल गावात उभारण्यात आला आहे. मात्र, त्या प्रकरणी उपसरपंच यांनी केलेल्या दाव्यावरुन समोर आलेली बाब धक्कादायक आहे.
गेल्या काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जमीनदोस्त झाला आहे. अशातच कांदा आणि द्राक्ष बागेचे शुक्रवारी आलेल्या पावसाने पुन्हा नुकसान केले आहे.
नाशिकच्या येवल्यात महाविकास आघाडीत फुटीचा बिगुल वाजला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारानं छगन भुजबळ यांचे आव्हान स्वीकारले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामध्ये अक्षरशः महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे.
शेतीत राब राबत येणाऱ्या पैशांवर बळीराजा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतमालाला जिवापाड जपत असतो. मात्र, नैसर्गिक संकट आल्यास स्वप्नांचा अक्षरशः चिखल होऊन जातो आहे. पुन्हा एकदा असेच संकट शेतकऱ्यांवर आले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. निमित्त बाजार समितीचे असले तरी जुनं राजकारण चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे आणि नरेंद्र दराडे यांना छगन भुजबळ यांनी खुलं आव्हान दिले आहे. आमदारकीला माझ्या समोर उभे राहा असे आवाहन दिले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी सानुग्रह अनुदानासाठी वंचीत राहू नये यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे एक मागणी मान्य न केल्यानं शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्याचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले असले तरी अद्यापही मोठी गर्दी अर्ज करण्यासाठी होत आहे.
जिल्हा बँकेच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत असतांना कर्ज वसूली करून सुद्धा शेतकऱ्यांनी मॅनेजरच्या बदली रद्दकरण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.