WTC 2023 : विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत, आरसीबी हेड कोच संजय बांगर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत स्पष्टच म्हणाले…
आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे उर्वरित पाच षटकं तो मैदानात उतरला नाही. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे.
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल जेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बंगळुरुने 20 षटकात 5 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 19.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली. तसेच बंगळुरु संघाचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. पराभवामुळे आरसीबी आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.दुसरीकडे, विराट कोहलीला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण 15 दिवसांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. त्याच्या दुखापतीबाबत आरसीबीचा हेड कोच संजय बांगर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
“हो, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे हे खरं आहे. पण चिंता करण्यासारखं कही कारण नाही. त्याने चार दिवसांच्या गॅपनंतर दोन बॅक टू बॅक सेंच्युरी मारल्या आहेत. इतकंच नाही तर तो क्षेत्ररक्षणातही आपलं योगदान देतो. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात तो खूप धावला आहे.साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातही 35 षटकापर्यंत मैदानात उभा होता. त्याने त्याचं सर्वोत्तम दिलं. दुखापत नक्कीच झाली आहे, पण चिंता करण्याचं कारण नाही.”, असं आरसीबी हेड कोच संजय बांगर याने सांगितलं.
गुजरात टायटन्सचा डाव सुरु असताना 15 व्या षटकात विजय शंकरचा झेल घेताना विराट कोहलीला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. उर्वरित पाच सामन्याचा खेळ त्याने तंबूत बसूनच पाहीला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7-11 जून दरम्यान होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन संघाचे खेळाडू
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.