IPL 2023 : शुभमन गिलच कौतुक करताना सचिन तेंडुलकर असं काय म्हणाला? ज्यामुळे खवळले RCB चे फॅन्स

IPL 2023 : कालच्या महत्त्वाच्या सामन्यात गुजरातने बँगलोरला हरवलं. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुभमन गिलचे कौतुक केलं. त्याचं शतक आणि मुंबईचं प्लेऑफ मध्ये जाण्याचा संबंध जोडून एक ट्विट केलं. यासोबत सचिनने कोहलीचेही कौतुक केले.

IPL 2023 : शुभमन गिलच कौतुक करताना सचिन तेंडुलकर असं काय म्हणाला? ज्यामुळे खवळले RCB चे फॅन्स
sachin Tendulkar tweet
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 3:25 PM

मुंबई :  मुंबई इंडियन्सचं आयपीएल 2023 च्या प्लेऑफ मध्ये पोहचण्याच स्वप्न जवळजवळ संपुष्टात आल होतं. पण 22 वर्षांचा शुभमन गिलनं लागोपाठ दूसरं शतक झळकवलं. त्याने विराट कोहलीच्या शतकावर पाणी फिरवलं, यासोबतच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं प्लेऑफ मध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ही मॅच जिंकली असती, तर 5 वेळेच्या विजेत्या मुंबई इंडीयन्सचा पत्ता कट झाला असता.

शुभमन गिलने खेळलेल्या शतकीय खेळीमुळे गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला. यासोबतच मुंबई इंडीयन्सचा प्लेऑफ मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला. या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने एक ट्विट करत शुभमनचे कौतुक केले. त्यात सचिनने लिहिलं, की कॅमरुन ग्रीन आणि शुभमन गिलने मुंबई इंडियंन्ससाठी खूप चांगली बॅटिंग केली, यासोबतच सचिनने एक इमोजीही वापरला होता.

एकाच दिवसात तीन सेंच्युरी

सचिन पुढं लिहितो- विराट कोहलीने खूप चांगली बॅटींग केली. लागोपाठ दुसरं शतक झळकावलं. मी आनंदी आहे की मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचली. काल झालेल्या दोन्ही सामन्यात एकाच दिवशी 3 शतक पहायला मिळाली. पहिलं हैदराबाद विरुद्ध मुंबईकडून कॅमरून ग्रीनने तर दुसऱ्या सामन्यात बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतक झळकवली. चाहत्यांना चांगलच जिव्हांरी लागलं

काल झालेले दोन्ही सामने रोमांचक ठरले. मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये पोहचली, तर रॉयल चॅलेंजर बँगलोरच्या चाहत्यांना यावर्षीही निराशा हाती लागली. यामुळे सचिनने केलेलं ट्विट बँगलोरच्या चाहत्यांना चांगलच जिव्हांरी लागलं. नशिबाच्या जोरावर मुंबईने यावर्षी प्लेऑफ मध्ये जागा बनवली. एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फाफ डू प्लेसिस आणि तिसरा बेस्ट स्कोरर विराट कोहलीची टीम प्लेऑफ मधुन बाहेर गेली.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.