IPL 2023 : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम स्टोरीचं कनेक्शन काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

आयपीएल 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र स्पर्धा एकीकडे आणि नेटकऱ्यांचे अंदाज दुसरीकडे असंच म्हणावं लागेल. नेटकरी कोणाचं नातं कोणासोबत जोडतील काय सांगता येत नाही. असंच काहीसं शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या बाबतीत घडलं आहे.

IPL 2023 : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम स्टोरीचं कनेक्शन काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा
IPL 2023 : शुभमन गिलने इन्स्टाग्राम स्टोरीवरून नेमकं काय सांगितलं? नेटकऱ्यांनी जोडलं साराशी नातं
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 2:28 PM

मुंबई : क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सारा तेंडुलकर आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शुभमन गिलही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून बरंच काही सांगून जातो. मात्र आयपीएलमधील गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यानंतर दोघांचे इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमधून दोघांना नेमकं काय सांगायचं आहे? याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्यापूर्वी सारा तेंडुलकरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन पोस्ट केल्या आहेत. त्यात सेल्फी पोझ देत हार्टशेप ब्लिंक होताना दिसत आहेत. तसेच त्यानंतर मुंबई जिंकल्याचं दाखवलं आहे. दुसरीकडे, शुभमन गिलने बंगळुरुला पराभूत केल्यानंतर वीज पडल्याचं दाखवत दोन निळ्या रंगाचे हार्टशेप शेअर केले आहेत. त्यामुळे त्या निळ्या रंगाच्या हार्टशेपचा संबंध मुंबई इंडियन्सशी जोडला जात आहे.

गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं. यामुळे मुंबई इंडियन्सला थेट फायदा झाला असून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित झालं आहे. या विजयानंतर लगेचच शुभमन गिलने आपलं इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली आहे. त्यातील निळ्या रंगाचे हार्टशेप बरंच काही सांगून जात असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण मुंबई इंडियन्सचे फॅन कायम ब्लू हार्ट ठेवतात.

शुभमन गिलने 52 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या जोरावर नाबाद 104 धावा केल्या. यामुळे गुजरातचा विजय सोपा झाला. तसेच मुंबईला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अनेकदा सामना खेळताना प्रेक्षकांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या गिलला साराच्या नावावरून चिडवल्याचं पाहिलं गेलं आहे. त्याचबरोबर या दोघांच्या सोशल मीडिया हँडलवरही नेटकऱ्यांचं लक्ष असतं.

शुभमन गिल आणि सारा यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत कोणीही अधिकृतरित्या काहीच बोललेलं नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वावड्या उठत आहेत. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर शुभमन गिलचे आभार मानल्याने नेटकरी वेगळाच संदर्भ जोडत आहे.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स एलिमिनेटर किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 23 मे रोजी गुजरात विरुद्ध चेन्नई सामना आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत जाईल. पराभूत झालेला संघ मुंबई आणि लखनऊ विजेत्या संघाशी भिडेल. त्यानंतर त्या संघाची अंतिम फेरीत वर्णी लागेल.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.