Mohammed Siraj IPL 2023 : सिराजच्या ‘त्या’ फोटोने सगळेच हळहळले, त्याला सर्वात जास्त दु:ख झालं, कारण….

Mohammed Siraj IPL 2023 : पराभवानंतर मोहम्मद सिराजचे डोळे पाणावले. मोहम्मद सिराजला सर्वात जास्त दु:ख होणं स्वाभाविक आहे. त्यामागे कारण सुद्धा तसच आहे. काल निकाल लागल्यानंतर सिराजचा मैदानातच झोपला, तो फोटो पाहून RCB चे फॅन्सही गहिवरले.

Mohammed Siraj IPL 2023 : सिराजच्या 'त्या' फोटोने सगळेच हळहळले, त्याला सर्वात जास्त दु:ख झालं, कारण....
Mohammed siraj ipl 2023Image Credit source: jio cinema
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 2:15 PM

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमच इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं. IPL 2023 टुर्नामेंटमध्ये काल त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. गुजरात टायटन्सने RCB चा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानंतर RCB टीममधील प्लेयर खूप भावूक झाले होते. शतकवीर विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही.

मुंबई इंडियन्सने सनराजयर्स हैदराबादला 8 विकेटने हरवल्यानंतर रॉयल चॅलेजर्स बँगलोरला गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवणं क्रमप्राप्त बनलं होतं. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्लेऑफची बर्थ निश्चित करण्यासाठी त्यांना विजय हवाच होता.

शुभमनने विजयाचा घास हिरावला

विराटच्या 61 चेंडूतील नाबाद 101 धावांनी बँगलोरच्या विजयाची आस निर्माण केली. त्याचवेळी शुभमन गिलच्या 52 चेंडूतील नाबाद 104 धावांनी RCB चा विजयाचा घास हिरावला. आरसीबीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 197 धावा केल्या. शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर आरामात विजय मिळवला.

विराट एकटा लढला

शुभमन गिलच्या बॅटमधून शतकी सिक्स निघाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेला विराट कोहली निराश झाला. विराटने या मॅचमध्ये खूप प्रयत्न केले. त्याने शतक साकारल. पण ते वाया गेलं. काल विराट आरसीबीकडून एकाकी लढला. ही झुंज व्यर्थ गेली. विराट-सिराज जबरदस्त खेळले

पराभवाच दु:ख इतकं होतं की, मोहम्मद सिराज मैदानातच झोपला. दु:ख, निराशा, हताशा आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये विराट कोहली आणि मोहम्मद सिराज दोघांनी जबरदस्त कामगिरी केली. विराटने 139.82 च्या सरासरीने 639 धावा केल्या. तेच मोहम्मद सिराजने 19.78 च्या सरासरीने 19 विकेट घेतले.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.