Virat Kohli IPL 2023 : ‘लोकांना वाटत होतं, माझं टी 20 करियर संपतय, पण….’, सलग दोन सेच्युरीनंतर विराट बोलला
Virat Kohli IPL 2023 : विराट कोहलीने काल गुजरात टायटन्स विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. त्याने धुवाधार बॅटिंग करुन शतक झळकावलं. पण शुभमन गिलमुळे त्याला शतकाचा आनंद साजरा करता आला नाही.
बंगळुरु : आयपीएलमध्ये सातव आणि सलग दुसरं शतक झळकवल्यानंतर विराट कोहलीने टीकाकारांवर निशाणा साधला. विराटच T20 करियर संपलं, असं जे म्हणत होते, त्यांच्यावर विराटने निशाणा साधला. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये मी माझं सर्वोत्तम क्रिकेट खेळतोय, असं विराटने सांगितलं. कोहलीचा स्ट्राइक रेट आणि मधल्या ओव्हर्समध्ये त्याच्या स्पिन गोलंदाजी खेळण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जायचे.
पण आता विराटने सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स विरुद्ध लागोपाठ शतक झळकावून टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक झळकवण्यामध्ये तो टॉपवर आहे,
विराट सेंच्युरीनंतर काय म्हणाला?
“मला भरपूर बरं वाटलं. माझी T20 क्रिकेटमध्ये घसरण होतेय, अस बऱ्याच जणांना वाटत होतं. माझ्या मनात कधीच असं आलं नाही. मला वाटतय, मी पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ T 20 क्रिकेट खेळतोय” असं विराट कोहली मॅच संपल्यानंतर म्हणाला. गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीकडून तो 61 चेंडूत नाबाद 101 धावांची इनिंग खेळला. त्याच्या बळावर RCB ने 20 ओव्हर्समध्ये 197 धावा केल्या.
विराट T20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांच्या समीप
कोहली म्हणाला, “मी एन्जॉय करतोय. मी अशाच प्रकारे टी 20 क्रिकेट खेळतो. मला गॅपमधून जास्तीत जास्त बाऊंड्री मारायच्या आहेत. मला संधी दिसल्यास, मी मोठे शॉट मारण्याचा प्रयत्न करतो” कोहली टी 20 क्रिकेटमध्ये 12,000 रन्सच्या जवळ जातोय. आयपीएल, आंतरराष्ट्रीय आणि सर्वच प्रकारचे टी 20 सामने मिळून कोहली 374 टी 20 सामने खेळलाय. त्याने 41.40 च्या सरासरीने 11,965 धावा केल्या आहेत. यात 8 सेंच्युरी आणि 91 हाफ सेंच्युरी आहेत. ‘तेव्हा रिस्क घ्यावी लागेल’
“परिस्थिती समजून तुम्हाला तसं खेळलं पाहिजे. गरज असेल, तेव्हा रिस्क घ्यावी लागेल. सध्या मी खेळाचा, माझ्या बॅटिंगचा आनंद घेतोय” असं कोहली म्हणाला. कोहली चालू आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्यांच्या यादीत लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. त्याने चालू सीजनमध्ये 14 सामन्यात 53.25 च्या सरासरीने 139.82 च्या स्ट्राइक रेटने 639 धावा केल्या आहेत. या लिस्टमध्ये आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस टॉपवर आहे. त्याने 56.15 च्या सरासरीने 153.68 च्या स्ट्राइक रेटने 730 धावा केल्या आहेत. गुजरातचा शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलकडे ऑरेन्ज कॅप मिळवण्याची संधी आहे.