MI vs RCB IPL 2023 : जिंकायच असेल, तर आजच्या ‘करो या मरो’ मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये ‘तो’ हवाच
MI vs RCB IPL 2023 : मुंबई इंडियन्ससाठी आता हारना मना हैं. पॉइंट्स टेबलमध्ये पाच टीम्सचे 10 पॉइंट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमला आता जिंकायच आहे. कुठल्याही टीमला पराभव परडवणारा नाहीय.
मुंबई : मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सामना आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. दोन्ही टीम्ससाठी ही मॅच महत्वाची आहे. कारण आजच्या सामन्यात जो जिंकेल, तो पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या नंबरवर जाईल. आजच्या सामन्यानंतर दोन्ही टीम्सकडे तीन सामने उरतील. सध्या पॉइंट्स टेबलवर नजर मारली, तर त्यात खूप चुरस दिसून येईल. पाच टीम्सचे 10 पॉइंट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमला आता जिंकायच आहे. कुठल्याही टीमला पराभव परडवणारा नाहीय.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकलेत. 5 मॅचमध्ये पराभव झालाय. मुंबईने पहिले दोन सामने गमावले. त्यानंतर सलग तीन सामने जिंकले. मुंबई इंडियन्सने अजून तरी विजेत्यांच्या थाटातील खेळ दाखवलेला नाही.
‘करो या मरो’ मुकाबला
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावलेलं आहे. अशी कामगिरी करणं, दुसऱ्या कुठल्याही टीमला जमलेलं नाही. चालू सीजनमध्ये मुंबई इंडियन्स टीमला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आजचा बँगलोर विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ मुकाबला आहे.
त्याच्याजागी ट्रिस्टन स्टब्स खेळलेला
मुंबई इंडियन्सच्या आजच्या सामन्यात तिलक वर्मावर नजर असेल. तिलक वर्मा मागच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता. आज वानखेडेवर होणाऱ्या मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होतो का? यावर नजर असेल. मागच्या सामन्यात तिलक वर्माच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला टीममध्ये स्थान दिलं होतं.
बदला घेण्याची संधी
आज तिलक वर्माने फिनिशरच्या रोलमध्ये रहावं, अशी मुंबई इंडियन्सची इच्छा असेल. पण तिलक वर्मा आजचा सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे का? हा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्स आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. RCB ने चालू सीजनच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्यसला पराभूत केलं होतं. मुंबई इंडियन्स टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पीयूष चावला, टिम डेविड, राघव गोयल, कैमरन ग्रीन, इशान किशन (विकेटकीपर), डुआन जानसेन, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, संदीप वारियर, ऋतिक शौकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंदुलकर, तिलक वर्मा, विष्णु विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव.