MI vs RCB IPL 2023 : मुंबई इंडियन्स आज RCB विरुद्ध जिंकली, तर सर्वात मोठा फायदा, कसा ते समजून घ्या
MI vs RCB IPL 2023 : आजचा एक विजय मुंबई इंडियन्सच मोठं टेन्शन कमी करेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आज जिंकावच लागेल. 36 दिवसानंतर मुंबई आणि आरसीबीची टीम आमने-सामने येईल. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा खूप मोठा फायदा होईल.
मुंबई : IPL 2023 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टीममध्ये शेवटची फाइट 36 दिवसांपूर्वी झाली होती. त्यावेळी विराट कोहलीची टीम सरस ठरली होती. पण आता रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सकडे बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. रोहितने आज विराटच्या RCB ला हरवलं, तर त्यांच्यासाठी तो मोठा झटका ठरेल. कारण आजच्या सामन्यात दोन्ही टीम्सपैकी कोणाचीही हार, फक्त एक पराभव नसेल, तर प्लेऑफच्या मार्गात मोठा अडथळा ठरेल.
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम याआधी 2 एप्रिलला आमने-सामने आली होती. बँगलोरने ती मॅच 8 विकेटने जिंकली होती. त्यावेळच्या जय-पराजयचा दोन्ही टीम्सवर फार मोठा फरक पडला नव्हता. आता त्यानंतर होणारा दुसरा सामना फक्त एक मॅच नाही, तर प्लेऑफच्या तिकिटाची लढाई आहे.
जिंकणाऱ्या टीमचा असा होणार मोठा फायदा
पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही टीम्सची स्थिती एकसारखीच आहे. 10 मॅचनंतर बँगलोरचे 10 पॉइंट्स आहेत. मुंबईचे सुद्धा तितकेच पॉइंट्स आहेत. चांगल्या रनरेटमुळे RCB सहाव्या आणि मुंबई 8 व्या नंबरवर आहे. आता दोन्ही टीम्सपैकी जी टीम जिंकेल, ती थेट तिसऱ्या नंबरवर पोहोचेल. म्हणजे प्लेऑफच्या ट्रेनमध्ये बर्थ पकडता येईल. भले, ती बर्थ कन्फर्म नसेल, पण प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहता येईल.
बँगलोरच पारडं जड
आयपीएलच्या पीचवर मुंबई आणि बँगलोरच्या टीममधला हा 32 वा सामना असेल. याआधी खेळल्या गेलेल्या 31 सामन्यात मुंबई इंडियन्सने 17 सामने जिंकलेत. RCB ने 14 मॅचमध्ये विजय मिळवलाय. दोन्ही टीम्समधील मागच्या 5 सामन्यांवर नजर टाकली, तर बँगलोरच पारडं जड आहे. बँगलोरची टीम 4-1 ने पुढे आहे.
होम ग्राऊंड सुरक्षित नाही
दोन्ही टीम्सची बलस्थान एकसमान आहेत. सामना वानखेडेवर आहे, त्यामुळे संधी मुंबईला जास्त आहे, असं आपण म्हणू शकतो. या सीजनमध्ये कुठल्याही टीमसाठी घरच मैदान सुरक्षित नाहीय. होमग्राऊंडवर अनेक टीम्सचा पराभव झालाय. MI vs RCB: Dream 11 Prediction
कीपर- इशान किशन
फलंदाज – फाफ डु प्लेसी, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, महिपाल लोमरोर
ऑलराउंडर्स- कॅमरुन ग्रीन, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाज- पीयूष चावला, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड