MI vs RCB IPL 2023 : मॅचआधी Virat Kohli तेंडुलकरच्या शरणात, सचिनच्या टीप्स मुंबईवरच भारी पडणार?
MI vs RCB IPL 2023 : आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना आहे. या मॅचआधी विराट कोहलीने सचिन तेंडुकरची भेट घेतली. दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई : भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी दोन दिग्गज आमने-सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होईल. बँगलोरच्या टीममध्ये विराट कोहली आहे. रोहित आणि विराट हे विद्यमान काळातील टॉप क्रिकेटर्स आहेत. भारतात या दोघांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. विराट कोहली सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. सचिनने मुंबईच आयपीएलमध्ये नेतृत्व केलय. आपले क्रिकेटमधील अनुभव तो मुंबईच्या खेळाडूंसोबत शेयर करत असतो. मुंबई विरुद्ध बँगलोर सामन्याआधी विराट आणि सचिनची भेट झाली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबई आणि बँगोलरमध्ये दोन एप्रिलला मॅच झाली. बँगलोरने यावेळी विजय मिळवला होता. मुंबईला या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
त्यावेळी कोहलीने सचिनला खांद्यावर उचलून घेतलेलं
कोहली आणि सचिनचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यात दोघे हसताना दिसतायत. कोहलीने सचिनच्या खांद्यावर हात ठेवलाय. कोहलीचा जगातील टॉप प्लेयर्समध्ये समावेश होतो. तो सचिनचा मोठा चाहता आहे. कोहलीने सचिनला पाहूनच क्रिकेटर बनण्याच स्वप्न पाहिलं होतं. तो सचिनला आपलं आदर्श मानतो. कोहली सचिनसोबत टीम इंडियातून खेळलाय. दोघे टीम इंडियाकडून वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळले होते. त्यावेळी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला. या विजयानंतर कोहलीने सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं होतं.
The meet-up of the GOATs – Sachin Tendulkar and Virat Kohli. pic.twitter.com/0XHHU9vpoT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2023
सचिनचा विक्रम कोणी मोडेल, तर तो विराटच
कोहली सचिनचा फॅन आहे. विराट, सचिनला भेटण्याची संधी कधीही सोडत नाही. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सेंच्युरी आहेत. सचिनचा हा विक्रम कोणी मोडू शकतो, तर तो विराट कोहली, असं म्हटलं जातं. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 75 सेंच्युरी आहेत. आज कोहलीकडून अपेक्षा
कोहली या सीजनमध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2023 मध्ये तो आतापर्यंत 10 मॅच खेळलाय. त्याने 45.56 च्या सरासरीने 419 धावा केल्या आहेत. त्याने सहा हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. वानखेडेवर विराटच्या बॅटमधून आणखी एक शतक येईल, अशी बँगलोरच्या टीमला अपेक्षा असेल. कोहलीने या भेटीत सचिन सोबत आपल्या बॅटिंगबाबत चर्चा केली असेल. सचिनने त्याला काही टिप्स दिल्याची सुद्धा शक्यता आहे. सचिनचा या टिप्स मुंबईवर भारी पडू नयेत, एवढीच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.