Nitish Rana IPL 2023 : KKR च्या विजयात नितीश राणाकडून चूक, चुकवावी लागली मोठी किंमत

Nitish Rana IPL 2023 : पंजाब किंग्स विरुद्ध नितीश राणा 38 चेंडूत 51 धावांची शानदार इनिंग खेळला. या विजयासह केकेआरने आपली प्लेऑफची आशा कायम ठेवली.

Nitish Rana IPL 2023 : KKR च्या विजयात नितीश राणाकडून चूक, चुकवावी लागली मोठी किंमत
kkr ipl 2023
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 10:37 AM

कोलकाता : इडन गार्डन्स स्टेडियमवर 8 मे रोजी संध्याकाळी केकेआर आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये केकेआरने पंजाब किंग्सला 5 विकेटने हरवलं. या विजयासह केकेआरने आपली प्लेऑफची आशा कायम ठेवली. या सगळ्या विजयाची स्क्रिप्ट मैदानात लिहिली जात असताना, केकेआरचा कॅप्टन नितीश राणाकडून चूक झाली. स्लो ओव्हर रेटची चूक त्याच्याकडून झाली. परिणामी त्याला दंड भरावा लागला.

कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयात नितीश राणाकडून चूक झाली. कॅप्टन म्हणून ओव्हर्सची गती मंदावरणार नाही, याची काळजी नितीश राणाला घ्यायची होती. त्याच्यावर IPL च्या अचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आलाय.

नितीश राणावर स्लो ओव्हर रेटचा दंड

स्लो ओव्हर रेटशी संबंधित केकेआरचा कॅप्टन नितीश राणाची ही पहिली चूक होती. त्यामुळे त्याच्या मॅच फी मधून 12 लाख रुपये कापण्यात आले. म्हणजेच त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश राणाने स्लो ओव्हर रेटशी संबंधित आपली चूक मॅच रेफ्रीकडे कबूल केली. त्यामुळे पुढे सुनावणीची गरज पडली नाही.

IPL 2023 मध्ये राणावर दुसऱ्यांदा दंड

IPL 2023 मध्ये नितीश राणाला दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचवेळी त्याच्या मॅच फी मधून 25 टक्के रक्कम कापण्यात आली होती. मुंबईचा गोलंदाज ऋतिक शौकीनशी भांडण केलं म्हणून, त्याची मॅच फी कापण्यात आली होती.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

स्लो ओवर रेटबद्दल कारवाई झालेला राणा पहिला कॅप्टन नाही

स्लो ओव्हर रेटबद्दल दंड झालेला नितीश राणा या सीजनमधील पहिला कॅप्टन नाहीय. पंजाब किंग्स विरुद्ध 38 चेंडूत 51 धावांची तो शानदार इनिंग खेळला. नितीश राणाच्या आधी हार्दिक पंड्या, फाफ डु प्लेसी, केएल राहुल सारख्या कॅप्टन्सवरही दंडात्कम कारवाई करण्यात आलीय. पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 179 धावा केल्या. कोलकाताने शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य पार केलं. केकेआरने 5 विकेट राखून विजय मिळवला.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.