पावसामुळे सध्या वातावरणात गारवा आहे. अशात विकेंडला मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत पिकनिकचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे.
माथेरान... महाराष्ट्रातील एक सुंदर आणि सर्वांना आकर्षक करणारं हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे पावसाळ्यात पर्यटक गर्दी करत असतात. इथं ट्रैकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि जिप-लाइनिंग सारख्या अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिट करता येतात.
लोणावळा... महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एकदातरी लोणावळ्याला फिरायला यायचंच असतं... पावसाळ्यात लोणावळा अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसतं.
लवासा... तुम्हाला मुंबईतील गोंगाटापासून दूर जाऊन काही दिवस इंन्जॉय करायचं असेल तर लवासा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
कर्जतला जाऊनही तुम्ही तुमचे मित्र आणि फॅमिलीसोबत इन्जॉय करू शकता. कर्जतमधील अल्हाददायक वातावरण तुम्हाला अधिक प्रसन्न बनवेल. विकेंड इन्जॉय केल्यानंतर तुम्ही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू शकता...