हळूहळू वेळ वाढवा: शाळेतून आल्यावर किंवा रात्री दिवसाची अशी वेळ निवडा ज्यावेळी तुम्ही शांतपणे वाचन करू शकता. एकदम वेळ देणं कधी कधी आव्हानात्मक असतं, ५ मिनिटाने सुरु करा. हळू हळू वाचनाची वेळ वाढवा.
आवडीचे विषय शोधा: हा फार महत्त्वाचा भाग आहे. वाचनाची आवड लावून घ्यायची असेल तर आवडते विषय वाचण्यापासून सुरुवात करा. जे विषय आवडतात ते वाचा.
बुक क्लब, रिडींग ग्रुप: वेगवेगळे ग्रुप्स असतात वाचनाचे, त्यात तुमच्या मुलांना सामील करा. इतर मुलांना बघून लहान मुलांनाही वाचनाची आवड लागते.
वाचन मजेदार करा: वाचन हे काम नसून आनंददायी असावे. वाचन मजेदार करण्याचे मार्ग शोधा, जसे की मित्रांसोबत ठरवा काय वाचायचं, कुठलं पुस्तक? मित्रांमध्ये चॅलेंज लावा आधी कोण पुस्तक वाचून संपवेल. मित्रांसोबत वेळ ठरवा कधीपर्यंत किती वाचन झालं पाहिजे. असं केल्यास मजा येईल आणि मजेदार पद्धतीने वाचनाची सुद्धा गोडी लागेल.
गॅजेट्स पासून लांब राहा: आजच्या डिजिटल युगात, विद्यार्थी खूप विचलित होतात. यामुळे वाचनावरून दुर्लक्ष होऊ शकतं. लक्ष केंद्रित करायला अडथळा येऊ शकतो. वाचण्यासाठी शांत जागा निवडा.वाचनाच्या वेळेत फोन, टीव्ही, कंप्यूटर या सगळ्यापासून लांब बसा.