Video | लाख खोट्या गोष्टींनंतर सत्य अखेर समोर, नवाजुद्दीन सिद्दीकीचा तो व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले, शेवटी…
नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. नवाजुद्दीन सिद्दीकी याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आलिया सिद्दीकी हिच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांना देखील अत्यंत मोठा झटका बसला. आलिया सतत आरोप (Accusation) करत असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकी हा शांत होता. आपल्या मुलांसोबत देखील नवाजुद्दीन सिद्दीकी हा चुकीचे वागत असल्याचे आलिया सिद्दीकी हिने म्हटले होते. ज्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याचे चाहते हैराण झाले.
इतकेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांचा वाद थेट कोर्टात पोहचला. काही दिवसांपूर्वीच आलिया हिने एक व्हिडीओ मध्यरात्री शेअर करत आरोप केला होता की, नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या मुंबईतील घरातून हाकलून दिले आहे. यावेळी आलिया ही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या मुंबईतील बंगल्याबाहेर दिसत होती. आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताना देखील आलिया दिसली.
काही दिवसांपूर्वीच आलिया सिद्दीकी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली. मात्र, बिग बाॅसच्या घरातील तिचा प्रवास खूपच कमी राहिला. आता नुकताच एक व्हिडीओ हा आलिया हिने शेअर केला आहे. विशेष म्हणजे आलिया हिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का हा बसला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची मुलगी आणि मुलगा दिसत आहेत.
View this post on Instagram
आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमध्ये तिने मुलांची काळजी आणि त्यांचा खर्च देत नसल्याचे देखील म्हटले होते. वडिलांचे कोणतेच कर्तव्य नवाजुद्दीन सिद्दीकी हा पार पाडत नसल्याचे आलिया हिने म्हटले होते. मात्र, आता आलिया हिने एक व्हिडीओ शेअर केला ज्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी थेट म्हटले की, ही आलिया नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर खोटे आरोप करत आहे हे या व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुलांची माया करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुलांसोबत दोन महिन्यांचा चांगला वेळ घालवल्याचे सांगताना आलिया सिद्दीकी ही दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.