HSC Result 2022 Maharashtra Board Declared LIVE : “तु चाल पुढं रे गड्या…”, पुढच्या प्रोसेससाठी लागणारी ‘ही’ कागदपत्रं तयार ठेवा…

| Updated on: Jun 08, 2022 | 10:11 PM

mahresult.nic.in 2022 hsc 12th result maharashtra board live news latest updates in marathi: महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल 8 जून 2022 जाहीर करण्यात आला. निकालाच्या संदर्भातले अपडेट्स, ब्रेकिंग, महत्त्वाच्या घडामोडी, सर्व अपडेट्स जाणून घ्या : निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

HSC Result 2022 Maharashtra Board Declared LIVE : तु चाल पुढं रे गड्या..., पुढच्या प्रोसेससाठी लागणारी 'ही' कागदपत्रं तयार ठेवा...
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…Image Credit source: TV9 marathi

Maharashtra board HSC Result 2022 online: बारावीचा निकाल आज, 8 जून 2022 रोजी जाहीर! ठीक दुपारी एक वाजता  निकाल लागला. निकालाचे सर्व ताजे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या करिअर विभागात पाहा. वाचा निकालाचे ताजे अपडेट्स. निकालासंदर्भातल्या अधिक माहितीसाठी TV9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगला भेट देत राहा. तुम्ही TV9 मराठीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल सुद्धा मिळवू शकता.

HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jun 2022 09:45 PM (IST)

    HSC result 2022: …तरी पोरांनो, महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार

    HSC result live: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जरी लागला असला तरी पोरांनो तुम्हाला महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेश लांबणीवर जाणार आहे. कसं काय? जाणून घेण्यासाठी…

    इथे क्लिक करा आणि सविस्तर वाचा

  • 08 Jun 2022 09:20 PM (IST)

    HSC result 2022: 2022च्या निकालाची “12 वैशिष्ट्ये”

    HSC result live: कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा, पोरांनी कहर केलाय! 2022च्या निकालाची 12 वैशिष्ट्ये, वाचा

    इथे क्लिक करा

  • 08 Jun 2022 09:05 PM (IST)

    HSC result 2022: ‘ही’ कागदपत्रं तयार ठेवा

    HSC result live: पुढच्या प्रोसेससाठी लागणारी ही कागदपत्रं तयार ठेवा

    गुणपत्रिका (Board Marksheet)

    स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate)

    उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)

    शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

    आधार कार्ड (Aadhar card)

    जातीचा दाखला (Caste Certificate)

    रहिवासी दाखला (Address Proof)

    पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

  • 08 Jun 2022 08:50 PM (IST)

    HSC result 2022: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश!

    HSC result live: बारावी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश!

    सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

  • 08 Jun 2022 08:23 PM (IST)

    HSC result 2022: अजूनही निकाल पाहायचा राहिला असेल तर…

    HSC result live: अजूनही जर तुमचा निकाल पाहायचा राहिला असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर येऊन निकाल चेक करू शकता.

    इथे क्लिक करा

  • 08 Jun 2022 08:08 PM (IST)

    HSC result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! ‘या’ तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

    HSC result live: बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! निकालानंतर ‘या’ तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

    इथे क्लिक करा

  • 08 Jun 2022 07:09 PM (IST)

    HSC result 2022: कोकणचा निकाल 97.21 टक्के, खालोखाल नागपूर 96.52 टक्के

    HSC result live: राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागलाय. यात कोकणच्या पोरांनी कहर केलाय तर मुंबईला यावेळी आपलं स्थान पहिल्या पाचमध्ये सुद्धा आणायला जमलेलं नाही. कोकणचा निकाल 97.21 टक्के त्या खालोखाल लगेचच नागपूरचा निकाल 96.52 टक्के लागलेला आहे.

    विभागावर निकाल

    अमरावती 96.34

    नाशिक 95.34

    लातूर 95.25

    कोल्हापूर 95.07

    औरंगाबाद 94.97

    पुणे 93.61

  • 08 Jun 2022 06:39 PM (IST)

    HSC result 2022: तुम्ही निकाल TV9 मराठीच्या वेबसाईटवर बघू शकता

    बारावीचा निकाल आज जाहीर झालाय. तुम्ही हा निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघू शकता. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे तुम्हाला हा निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा.

  • 08 Jun 2022 05:53 PM (IST)

    HSC result 2022: वाह! गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 96.00 टक्के

    – गडचिरोली जिह्मात इयत्ता 12 वीचा एकूण निकाल 96.00 टक्के

    – जिल्ह्यात एकूण 12,918 परीक्षेसाठी अर्ज, यापैकी 12,721 जण प्रत्यक्ष परीक्षेत बसले

    – यात 6,489 विद्यार्थी व 6,232 विद्यार्थिनी आहेत. परिक्षेला बसलेल्या पैकी 12,213 जण उत्तीर्ण झाले.

    – यात 6,188 (95.36%) विद्यार्थी, 6025(97.67%) विद्यार्थिनी उत्तीर्ण आहेत.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 05:21 PM (IST)

    HSC result 2022: निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांचा जल्लोष

    HSC result live: फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यावर जल्लोष केलाय. ऑनलाईन कॉलेज आणि अचानक ऑफलाईन परीक्षा झाल्या पण तरी आम्ही कहर केला अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागला, परीक्षा ऑफलाईन द्यावी लागली. खूप सारे बदल झाले पण तरीही निकाल मनासारखा लागलाय असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय.

  • 08 Jun 2022 04:55 PM (IST)

    HSC result 2022: निकालाविषयी…

    बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक

    निकालात प्रॅक्टिकल आणि थेअरी मार्क्स स्वतंत्रपणे असणार

    दोन्हीमध्ये स्वतंत्र पासिंग आहे

    पास न झाल्यास किंवा मार्क्स कमी मिळाल्यास विद्यार्थी रिचेकिंग (पुन्हा तपासणीसाठी) साठी अर्ज करू शकतात

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 04:24 PM (IST)

    HSC result 2022: तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीची गुणपत्रिका मिळणार

    HSC result live: मित्रांनो, बारावीची गुणपत्रिका 17 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता तुम्हाला तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात मिळणार आहे.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 03:55 PM (IST)

    HSC result 2022: बारावीच्या निकालात मुलीच पुढे!

    HSC result live: यंदा बारावीत 95.35 टक्के मुली, 93.29 टक्के मुलं उत्तीर्ण

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 03:35 PM (IST)

    HSC result live : रिचेकींगसाठी फी किती ?

    HSC result live: बारावीच्या गुणांबाबत शंका असेल आणि पेपर पुन्हा रिचेकींगला टाकायचा असेल, तर मग फी किती द्यावी लागेल?

    जर छायाप्रत हवी असेल तर प्रत्येक विषयासाठी 400 रुपये शुल्क

    पुनर्मूल्यांकनासाठी 300 रुपये प्रति विषय इतके शुल्क

    गुणपडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये शुल्क

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक: https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 03:15 PM (IST)

    HSC result 2022: शिक्षक,पालक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन!- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

    HSC result live: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन केलंय. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ज्या प्रकारे संयम बाळगून आणि मोठ्या कष्टाने कोरोना आणि बारावीची परीक्षा दोन्हीशी लढाई केली आहे त्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी शाबासकी दिली आहे.

  • 08 Jun 2022 03:02 PM (IST)

    HSC result 2022 : खालील विद्यार्थ्यांना प्राधान्यानं रिचेकिंग करून मिळणार

    HSC result live: खालील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन तातडीनं आणि प्राधान्यानं करून मिळणार आहे.

    जेईई (JEE Exam) देणारे विद्यार्थी नीट परीक्षा (NEET Exam) देणारे विद्यार्थी विज्ञान शाखेचे (Science Stream) विद्यार्थी

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 02:44 PM (IST)

    HSC result 2022: निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संदेश

    HSC result live: बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 02:30 PM (IST)

    HSC result 2022 : उत्तीर्ण होण्याची टक्केवारी

    HSC result 2022 : एकूण टक्केवारीची सविस्तर आकडेवारी

    विद्यार्थीनी पास होण्याची टक्केवारी : 95.35%

    विद्यार्थी पास होण्याची टक्केवारी: 93.29%

    बारावीच निकालाची एकूण टक्केवारी: 94.22%.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 02:19 PM (IST)

    HSC result 2022 : बारावीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी

    Maharashtra HSC Result 2022: बारावी निकालाचे ताजे अपडेट्स

    एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते?: 14,85,191

    विद्यार्थी : 8,17,188

    विद्यार्थीनी : 6,68,003

    किती जण उत्तीर्ण: 13,56,604

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 02:08 PM (IST)

    कोण आहेत बारावीचे टॉपर्स?

    बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी जास्त मार्क मिळवलेत. महाराष्ट्र बोर्डाकडून गेल्या काही वर्षांपासून टॉपर्स लिस्ट देणं बंद करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांमधील स्पर्धेला अटीतटीचं स्वरुप येऊ नये, यासाठी बोर्डाकडून टॉपर्स विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणं बंद करण्यात आलं होतं. मात्र विभागीय निकालात कोण पुढे आणि कोण मागे, याची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:44 PM (IST)

    HSC result live : बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन संदेश

    ‘संधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा!’

    Maharashtra HSC Result 2022:बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

    मुख्यमंत्री संदेशात म्हणतात,

    आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:39 PM (IST)

    HSC result live :असा आहे मागच्या 3 वर्षांच्या बारावीचा निकाल

    HSC result live : मागच्या तीन वर्षांच्या निकाल जाणून घ्या..

    वर्ष 2020 मध्ये 90.66 इतकी पासिंगची टक्केवारी होती

    वर्ष 2021 मध्ये 99.63% इतकी पासिंगची टक्केवारी होती

    वर्ष 2022 मध्ये 94.22% इतकी पासिंगची टक्केवारी होती

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:34 PM (IST)

    बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंंदन!

    बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. निकाल अजूनही पाहिला नसेल तर तो तातडीनं चेक करुन घ्या. किती मार्क मिळाले, हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:29 PM (IST)

    बारावीच्या विद्यार्थ्यीनींचं विशेष कौतुक!

    बारावीच्या निकालात मुली ठरल्या सरस

    बारावीच्या निकालात मुलांची पिछाडी, मुलींची आघाडी

    कोकणासह मुंबई, पुणे आणि राज्यातील महत्त्वाच्या भागत नेमका किती निकाल?

    सगळ्याची अप-टू-डेट माहिती जाणून घ्या : वाचा सविस्तर रिपोर्ट

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:20 PM (IST)

    HSC result live : रिचेकींगसाठी किती असेल फी?

    HSC result live : बारावीच्या गुणांबाबत शंका असेल आणि पेपर पुन्हा रिचेकींगला टाकायचा असेल, तर मग फी किती द्यावी लागेल?

    जर छायाप्रत हवी असेल तर प्रत्येक विषयासाठी 400 रुपये शुल्क

    रिचेकिंग, गुणपडताळणीसाठी 300 रुपये प्रति विषय इतके शुल्क

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:13 PM (IST)

    HSC result live : राज्यात 158 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला

    HSC result live :  बारावीच्या  सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर. निकाल लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा. निकाल पाहण्यासाठी हवा फक्त तुमचा रोल नंबर किंवा आईचं नाव…

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:11 PM (IST)

    HSC Result 2022 : बारावीच्या निकालात मुंबई कितवी?

    HSC Result 2022 Maharashtra Board : बारावीच्या निकाला मुंबई सगळ्यात मागे असल्याचं बघायला मिळालंय. मुंबईमध्ये 90.11 टक्के निकाल लागलाय.

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: निकाल जाहीर! इथे पाहा निकाल

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 01:06 PM (IST)

    HSC result 2022 : निकाल कुठे पाहायचा? ‘ही’ लिंक आहे की…

    HSC Result 2022 Maharashtra Board Link LIVE at maharesult.nic.in and TV9 Marathi: बारावीचा निकाल लागला. तातडीनं लगेच निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    लाईव्ह निकाल पाहण्यासाठी लिंक : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th

  • 08 Jun 2022 12:56 PM (IST)

    Maharashtra HSC Result 2022 : Video : निकाल लागला!

    HSC result live : बारावी निकाल लागला, काय आहे निकालाच्या मोठ्या गोष्टी? कुणाची निकालाच बाजी? कोण विभाग पडला मागे? निकालाची एकूण टक्केवारी किती?

    पाहा व्हिडीओ :

  • 08 Jun 2022 12:45 PM (IST)

    HSC result 2022 Live : निकाल लागला! काय आहे निकालाची खास गोष्ट?

    HSC result live: आता अवघ्या काही क्षणांची प्रतिक्षा…

    बरोबर एक वाजता निकाल लाईव्ह…

    निकालाचे ताजे अपडेट्स पाहा, टीव्ही 9 मराठीसोबत

    वाचा बारावी परीक्षा 2022च्या  निकालाची 11 खास वैशिष्ट्य – प्रतिनिधी रचना भोंडवे यांचा खास रिपोर्ट  – कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा, पोरांनी कहर केलाय!

  • 08 Jun 2022 12:36 PM (IST)

    Maharashtra HSC Result 2022 : नापास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट

    HSC result live : नापास झालेल्या 5.78 टक्के विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं कारण नाहीये. त्यांना पुरवणीपरीक्षेच्या माध्यमातून पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.

  • 08 Jun 2022 12:30 PM (IST)

    Maharashtra HSC Result 2022: ओरीजीनल मार्कशीट कधी मिळणार?

    HSC result live निकाल लागल्यानंतर 17 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशीट (गुणपत्रिका) वितरीत केल्या जाणार आहेत. शिक्षण मंडळाचे प्रभागीय सचिव माणिक बांगर यांनी ही माहिती दिली आहे.

  • 08 Jun 2022 12:27 PM (IST)

    HSC result live : 2 लाख 30 हजार 769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण

    Maharashtra HSC Result 2022: एकूण 2 लाख 30 हजार 769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले आहेत. एकूण 14 लाखापेक्षाही अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. मागच्या पेक्षा या वर्षी बारावीच्या निकालात 5.41 टक्क्यांची घट झाली आहे.

  • 08 Jun 2022 12:21 PM (IST)

    Maharashtra HSC Result 2022: गेल्या वर्षी परीक्षाच झाली नव्हती, पण..

    HSC result live गेल्या कोरोनामुळे बारावीची परीक्षाच झाली नव्हती. त्यामुळे 30-30-40 या तत्त्वावर विद्यार्थ्यांचा निकाल लावला गेला होता. विक्रमी निकाल गेल्या वर्षी लागला होता. दहावीच्या तीन विषयांचे मार्क, अकरावीच्या अंतिम वर्षाचे गुण आणि बारावीतील असाईन्मेन्टमध्ये मिळवलेले मार्क या आधारावर बारावीचा निकाल गेल्या वर्षी लावण्यात आला होता.

  • 08 Jun 2022 12:15 PM (IST)

    12th Result 2022 : दिव्यांग विद्यार्थ्यांची तेजस्वी कामगिरी

    HSC result live : राज्यात 6 हजार 333 दिव्यांग विद्यार्थ्यांनी 12 वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 301 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95. 24 इतकी आहे.

  • 08 Jun 2022 12:11 PM (IST)

    Maharashtra HSC Result 2022: निकालाबाबत आक्षेप? कशी नोंदवायची तक्रार?

    HSC result live : तुम्हाला मिळालेले गुण कमी वाटत असली, निकालाबाबत काही तक्रार असेल, तर तुम्हाला ती तक्रार कुठे करायची, याचीही माहिती असणं आवश्यक आहे. www.mahahsscboard.in या वेबसाईटवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांकडे तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकतात. विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांना या तक्रारी दहा दिवसांत निकाली काढाव्या लागणार आहेत.

  • 08 Jun 2022 12:08 PM (IST)

    12th Result 2022 : सायन्सवाले सगळ्यात पुढे, आर्ट मागे!

    12th Result 2022 : कोणत्या कॅटेगिरीचा निकाल किती टक्के लागला?
    1. विज्ञान 98.30
    2. कला 90.52
    3. वाणिज्य 91.71
    4. व्यवसाय अभ्यासक्रम 92.40
    5. आय.टी. आय 66.41
    फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला, पण 2021च्या तुलनेत निकालात लक्षणीय घट. 2022मध्ये जवळपास 100 टक्के निकाल लागला होता.
  • 08 Jun 2022 12:03 PM (IST)

    HSC result live : निकालानंतरही वाट पाहावी लागणार, कारण..

    HSC result 2022 : निकाल लागल्यानंतर पुढे काय? तर विद्यार्थ्यांनो, निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचं हे तुम्ही ठरवलेलं असेलच, पण निकालानंतर लगेच काही प्रवेश प्रक्रिया सुरु होणार नाही. निकालानंतर काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. या मागचं नेमकं कारण काय आहे, वाचा टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधी रचना भोंडवे यांचा खास रिपोर्ट : निकालानंतरही वाट पाहावीच लागणार, कारण…

  • 08 Jun 2022 11:51 AM (IST)

    रोल नंबर तयार ठेवलाय ना? आता हे पेज ओपन करुन ठेवा..

    निकालाला उरला अवघा एक तास, रोल नंबर तयार ठेवलाय ना? इथे पाहा निकालाचे अचूक अपडेट्स

    विद्यार्थी पालकांनो, टीव्ही 9 मराठीसोबत बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा. बारावीचा निकाल लाईव्ह

  • 08 Jun 2022 11:45 AM (IST)

    Maharashtra HSC Result 2022 : गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल कमीच…

    Maharashtra HSC Result 2022:गेल्या वर्षी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक निकाल लागला होता. कोरोनात तब्बल 99.63 टक्के निकाल लागला होता. आता यात मोठी घट झाली आहे. यंदा 94.22 टक्के इतका निकाल लागला आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा झाली होती.

    विभागावर निकाल

    पुणे 93.61 नागपूर 96.52 औरंगाबाद 94.97 मुंबई 90.11 कोल्हापूर 95.07 अमरावती 96.34 नाशिक 95.34 लातूर 95.25या कोकण 97.21

  • 08 Jun 2022 11:28 AM (IST)

    HSC result live : शाब्बास पोरांनो, निकालात वाढ!

    HSC result live : फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला

  • 08 Jun 2022 11:08 AM (IST)

    कोकण नंबर एक, मुंबई मागून पहिली!

    आज जाहीर होणार बारावीचा निकाल

    बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत जाहीर करणार निकाल

    दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार

    यावर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के लागल्याची माहिती

    सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 97.21 टक्के

    तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के

    यावर्षीही निकालात मुलींनी मारली बाजी

    राज्याचा निकाल 94.22 टक्के

  • 08 Jun 2022 11:04 AM (IST)

    12th Result 2022 : बारावीचा निकाल 94. 22 टक्के, कोकण अव्वल

    बोर्डाची पत्रकार परिषद

    HSC result live : बारावीच्या निकालाची सगळ्यात मोठी बातमी, बोर्डाची पत्रकार परिषद सुरु, कशी घेतली होती परीक्षा, याबाबत देण्यात येतेय माहिती

    या वर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के

    सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 97.21 टक्के

    तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के

    पाहा व्हिडीओ :

  • 08 Jun 2022 10:58 AM (IST)

    HSC result 2022 : निकालाआधीच 120 मिनिटं.. असा पाहा निकाल

    टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही असा पाहू शकाल निकाल

    HSC result live : बारावीच्या निकालाला आता फक्त 120 मिनिटं शिल्लक आहेत. पुढच्या दोन तासांत निकालाचं चित्र स्पष्ट होईल. पण निकालाची आधीची धाकधूक विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आहे.

    टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही असा पाहू शकाल निकाल :

    1. जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या
    2. होम पेज किंवा करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा किंवा
    3. महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर थेट होम पेजवर क्लिक करा
    4. आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा
    5. निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर उपलब्ध होईल
  • 08 Jun 2022 10:55 AM (IST)

    12th Result 202 : म्हणून यंदाचा निकाल फार फार महत्त्वाचा

    HSC result 2022 : आज मजल दरमजल करत आपण बारावीच्या निकालापर्यंत पोहचलोय. आजचा दिवस तुमच्यासाठी अवघड आहे. दोन वर्ष आपण सगळेच कोरोना महामारीत होतो. पेपर लिहायची सवय सुटली होती. अभ्यास करायची सवय राहिली नव्हती. कधी ऑनलाईन कॉलेज, कधी ऑनलाईन परीक्षा असं करत करत अखेर परीक्षा झाली आणि आज निकालाची वेळी आली. आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल आपल्या टीव्ही९ मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा.

  • 08 Jun 2022 10:49 AM (IST)

    HSC result 2022 : पूनर्मूल्यांकनासाठी ‘ही’ तारीख शेवटची

    12th Result 2022 : पूनर्मूल्यांकनासाठी शिक्षण मंडळाकडून अखेरची तारीख कोणती असेल, तेही समोर आलंय. 10 जूनपासून पुन्हा पूर्नमुल्यांकन करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे, तर 29 जूनपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा सबमिट कराव्या लागणार आहेत.

  • 08 Jun 2022 10:41 AM (IST)

    HSC result 2022 : पूर्नमूल्यांकनासाठी मोजावे लागणार पैसे

    HSC result live : ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल.

    वाचा सविस्तर बातमी : बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! निकालानंतर ‘या’ तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

  • 08 Jun 2022 09:45 AM (IST)

    HSC result 2022 : बारावीच्या परीक्षेची खास गोष्ट..

    HSC result 2022 : बारावीच्या परीक्षेची खास बाब म्हणजे यावेळी प्रॅक्टीकल परीक्षा झाल्यात नव्हत्या. त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात 40 टक्के गुण प्रॅक्टिकलच्या आधारावर देण्यात आले होते. यंदा बारावी परीक्षेसाठी केंद्रही वाढवण्यात आली होती. कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठा फार प्रवास करावा लागू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

  • 08 Jun 2022 09:38 AM (IST)

    HSC result 2022 : निकाल दुपारी! पुढचा प्रवेश कधी?

    HSC result live : आज दुपारी निकाल लागल्यानंतरत प्रवेशप्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागणार आहे. कारण महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जरी लागला असला तरी सीबीएसई आणि आयसीएसईचा बारावी बोर्टाचा निकाल अद्याप लागण्याच वेळ आहे. त्यामुळे प्रवेश प्रकियेसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

  • 08 Jun 2022 09:31 AM (IST)

    12th Result 2022 : निकाल लागल्यानंतर मार्कशीट कधी मिळणार? उत्तर मिळालं

    Maharashtra Class 12 Result 2022: बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्कशीट 17 जून पासून मिळू शकेल. 17 जूनला दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळवता येईल.

  • 08 Jun 2022 09:09 AM (IST)

    12th Result 2022 : बारावीच्या निकालाची धागधूक

    HSC result live : निकालाची धाकधूक, चार तासांपेक्षाही कमी वेळ शिल्लक, एक वाजण्याची प्रतिक्षा, टीव्ही 9 मराठीसोबत पाहा बारावीचा निकाल लाईव्ह, आपला रिझल्ट चेक करण्यासाठी वाचत राहा, ताजे अपडेट्स

  • 08 Jun 2022 08:56 AM (IST)

    HSC result live : 2021 मध्ये लागलेल्या निकालाची आकडेवारी

    HSC result 2022 : गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला होता. यात विज्ञान शाखेतील टक्के आर्ट्समधील 99.45 तर कॉमर्सचा निकाल 99.91 टक्के लागला होता.

  • 08 Jun 2022 08:42 AM (IST)

    HSC result 2022 : इंटरनेट नाही, चिंता नको! असा मिळवा मोबाईलवर निकाल

    12th Result 2022 : इंटरनेट नसेल तर SMS नेही तुम्हाला निकाल थेट तुमच्या मोबाईल फोनवर मिळून जाईल. त्यासाठी एक SMS फक्त करावा लागणार आहे. MHHSC (रोल नंबर) हे टाईप करायचं आणि 57766 या नंबरवर मेसेज पाठवून द्यायचा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर थेट निकाल पाठवला जाईल.

  • 08 Jun 2022 07:34 AM (IST)

    ‘इतके’ गुण मिळाले, तरच बारावी पास! जाणून घ्या पासिंग क्रायटेरिया

    बारावीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळवावे लागतील

    जे विद्यार्थी 35 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण मिळवतील ,ते उत्तीर्ण होतील

    जे विद्यार्थी 35 टक्के गुण मिळवू शकणार नाहीत, त्यांनी पुरवणी परीक्षेतून पुन्हा परीक्षेला बसण्याचीही संधी मिळेल

  • 08 Jun 2022 07:32 AM (IST)

    निकालानंतर पूनर्मूल्यांकनासाठी ‘या’ दिवशी अर्ज करता येणार

    बारावीच्या निकालानंतर पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना 48 तासांनी अर्ज करता येऊ शकेल.

    त्यासाठी तारखा, प्रक्रिया अशी सगळी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर रिपोर्ट – इथे क्लिक करा. 

  • 08 Jun 2022 06:35 AM (IST)

    इथून Download करा तुमचा निकाल!

    बारावीचा निकाल लागल्यानंतर तो तपासण्यासाठी इथे क्लिक करा, तसंच निकाल डाऊनलोड करण्यासाठीची लिंकही विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर इथेच देण्यात येईल.

  • 08 Jun 2022 06:33 AM (IST)

    ..तर बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी आहेच!

    बारावी परीक्षेत यश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे

    सप्लीमेन्ट्री परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार…

  • 08 Jun 2022 06:32 AM (IST)

    आज दुपारी 1 वाजता निकाल

    आज दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार

    ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर होणार

    निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष

    निकालाच्या उत्सुकतेने धाकधूक वाढली

  • 07 Jun 2022 08:06 PM (IST)

    निकाल चेक करण्याआधी…

    संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.

    सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत

    सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे

    आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येऊ शकेल

    टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही थेट, वेगवान आणि अचूक निकाल कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणावरुन पाहू शकाल

  • 07 Jun 2022 07:49 PM (IST)

    यावेळचा 12वीचा निकाल जरा खास

    यावेळचा 12वीचा निकाल जरा खास आहे. 2 वर्ष कोरोना महामारी, दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन. यावेळी मात्र महामारीनंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. आता उद्या, बुधवारी निकाल लागणार असून पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

  • 07 Jun 2022 07:33 PM (IST)

    निकालानंतर ‘ही’ कागपत्रं असतील आवश्यक

    गुणपत्रिका (Board Marksheet)

    स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate)

    उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)

    शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

    आधार कार्ड (Aadhar card)

    जातीचा दाखला (Caste Certificate)

    रहिवासी दाखला (Address Proof)

    पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

  • 07 Jun 2022 07:17 PM (IST)

    इकडे तिकडे जायचंच नाही, थेट TV9 मराठीवर यायचं, रिझल्ट मिळवायचा!

    बारावीचा निकाल चेक करण्यासाठी खालच्या वेबसाईट लक्षात ठेवा

    इकडे तिकडे रिझल्ट बघण्यापेक्षा तुम्ही TV9 मराठीच्या वेबसाईटला भेट देऊन रिझल्ट चेक करू शकता

    http://hscresult.mkcl.org

    https://hsc.mahresults.org.in

    http://mahresult.nic.in

  • 07 Jun 2022 07:02 PM (IST)

    ऑल इज वेल!

    बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले आहेत म्हणजे फक्त तुम्हाला टेन्शन नाही. जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आज रात्री झोप लागणार नाही. टेन्शन येईल! धाकधूक जरी वाढली असली तरी स्वतःला शांत करा…रोल नंबर विसरून जाल इतकं टेन्शन घेऊ नका. ऑल इज वेल!

  • 07 Jun 2022 06:46 PM (IST)

    पेपर रिचेकिंगला टाकायचा असेल तर…

    पोरांनो, महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. निकालात प्रॅक्टिकल आणि थेअरी मार्क्स स्वतंत्रपणे असणार आहेत आणि दोन्हीमध्ये स्वतंत्र पासिंग आहे. पास न झाल्यास किंवा मार्क्स कमी मिळाल्यास विद्यार्थी रिचेकिंगसाठी (पुन्हा तपासणीसाठी) अर्ज करू शकतात. यासाठीची नोटीस रिझल्ट लागल्यानंतर जारी करण्यात येणार आहे.

  • 07 Jun 2022 06:25 PM (IST)

    …विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

    निकालाला अवघे काही क्षण आता शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. उद्या 8 जून 2022 (बुधवारी) दुपारी एक वाजता निकाल जाहीर केले जातील. त्यानंतर दुपारी चार वाजता निकालांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 07 Jun 2022 06:10 PM (IST)

    परीक्षेचा निकाल उद्या दि. 8 जून,2022 रोजी ऑनलाईन जाहीर होईल – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 8 जून,2022 रोजी दु.1:00 वा. ऑनलाईन जाहीर होईल – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

  • 07 Jun 2022 05:56 PM (IST)

    परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते

    बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी बसले होते, हे जाणून घेऊयात..

    सायन्स : 6लाख 32 हजार 994

    आर्ट्स : 4 लाख 37 हजार 336

    कॉमर्स : 3 लाख 64 हजार 362

    व्यावसायिक अभ्यासक्रम : 50 हजार 202

Published On - Jun 08,2022 5:00 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.