WTC Final 2023 | टीममधून आधी डच्चू, आता सूर्यकुमार यादव याच्यासाठी गूडन्युज!
टीम इंडियाचे 2 खेळाडू हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आधी दुखापतीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढलेली असताना सूर्यकुमार यादव याला गूडन्युज मिळाली आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी बीसीसीआयने 25 एप्रिल रोजी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये सू्र्यकुमार यादव याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मात्र आता सूर्यकुमार यादव याला गूडन्युज मिळू शकते. सूर्यकुमार यादव याची टीम इंडियात डब्ल्यूटीसी फायनलसाठी एन्ट्री होऊ शकते. बीसीसीआयने सुर्याला इंग्लंडला प्रवास करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्यासाठी सांगितलं आहे.
सूर्यकुमार यादव सध्या आयपीएल 16 व्या सिजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय. हा 16 वा हंगाम संपल्यानंतर सूर्यकुमार इंग्लंडसाठी रवाना होऊ शकतो. सूर्यकुमार यादव याचा टीम इंडियाच राखीव खेळाडू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सूर्यकुमार यादव हा इंग्लडंला जाणार हे अधिकृतरित्या ठरलेलं नाही. मात्र सूर्यकुमार यादव याला यूके व्हीजा तयार ठेवण्यासाठी सांगितलं आहे.”
सूर्यकुमार यादव याच्या व्यतिरिक्त आणखी 5 खेळाडू आहेत, ज्यांना राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडला जाण्याची संधी मिळू शकते. या 5 जणांच्या यादीत ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, इशान किशन, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांचा समावेश असू शकतो. दरम्यान टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघातील 2 खेळाडू हे दुखापतीचे शिकार झाले आहेत. यामध्ये केएल राहुल आणि जयदेव उनाडकड या दोघांचा समावेश आहे.
केएल राहुल याने स्वत: पोस्ट करत आपण दुखापतीमुळे बाहेर पडल्याचं जाहीर केलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसारखी महत्वाची स्पर्धा तोंडावर असताना टीम इंडियाचे 2 खेळाडू इजंर्ड झाल्याने टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलंय. आता या दोघांच्या जागी कुणाची वर्णी लागते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.