WTC Final 2023 | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियात या क्रिकेटरची एन्ट्री
टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी टीम इंडिया 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळली होती. तर आता रोहि शर्माच्या कॅप्टन्सीत खेळणार आहे.
मुंबई | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. या महामुकाबल्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने संघ जाहीर केला आहे. मात्र केएल राहुल याला दुखापत झाल्याने टीम मॅनेजमेंटने संघात बदल केला आहे. निवड समितीने केएल राहुल याच्या जागी इशान किशन याला संधी दिली आहे. तसेच 3 खेळाडूंचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला आहे. या 3 पैकी एक असा क्रिकेटर असा आहे, ज्याने फक्त 1 कसोटी सामना खेळला आहे.
निवड समितीने राखीव खेळाडू म्हणून ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव या तिघांनी निवड केली आहे. सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत फक्त 1 कसोटी सामना खेळला आहे. मात्र त्यानंतरही सूर्याने राखीव खेळाडूंमध्ये संधी मिळवत बाजी मारली आहे. सूर्याला गेल्या काही महिन्यात त्याच्या लौकीकाला सादेशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र त्याला आता पुन्हा सूर गवसला आहे.
सूर्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलं होतं. मात्र सूर्याला कसोटी पदार्पणात आपली छाप सोडता आली नाही. सूर्या डेब्यू मॅचमध्ये 8 धावांवर आऊट झाला. त्याानंतर सूर्याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
सूर्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एकूण 72 सामने खेळले आहेत. सूर्याने अनुक्रमे 23 वनडे, 48 टी 20 आणि 1 कसोटी सामना खेळला आहे. सूर्याने वनडेमध्ये 433 आणि टी 20 मध्ये 1 हजार 675 धावा केल्या आहेत.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
WTC Final साठी राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.