Video | IPL 2023 : हार्दिक पंड्याला त्याच्या वहिनीने फसवलं? सामन्याआधीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांसमोर आले होते. अशातच या सामन्याआधीचा हार्दिक पंड्याच्या वहिणीचा म्हणजेच कृणाल पंड्या याच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे.

Video | IPL 2023 : हार्दिक पंड्याला त्याच्या वहिनीने फसवलं? सामन्याआधीचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 9:57 PM

मुंबई : टीम इंडियामध्ये अनेक खेळाडू सख्खे भाऊ खेळून गेले आहेत. आताच्या घडीला पंड्या बंधू एकत्र खेळताना दिसतात. आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये 51 व्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या एकमेकांसमोर आले होते. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांसमोर आले होते. अशातच या सामन्याआधीचा हार्दिक पंड्याच्या वहिणीचा म्हणजेच कृणाल पंड्या याच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे.

सख्खे भाऊ एकमेकांना भिडणार असल्याने घरामध्येही त्यांच्या आनंदाचं वातावरण होतं. पण कोणाच्या संघाला सपोर्ट करायचा यावरून संभ्रमात पडले होते. पंड्या कुंटूंबियांचा व्हॉट्सअॅप ग्रुपवरही या सामन्याची चर्चा सुरू होती. हार्दिकची वहिनी पंखुरी शर्माने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तिने स्वतःच मॅचपूर्वी काय केलं होतं याबाबत खुलासा केला आहे.

लखनऊने सामन्यापूर्वी पंखुरीचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती दोन भावांमधील भांडणावर बोलत होती. पंखुरी म्हणाली की, तिच्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज आला होता की एक पंड्या नक्कीच जिंकेल. पंखुरीने लखनऊ संघाला आपल्या कुटुंबीयांकडून सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

पंखुरीने कुटुंबातील सदस्यांना गुजरातमधून हवी तितकी तिकिटे खरेदी करण्यास सांगितले. परंतु त्यांना लखनऊलाच सपोर्ट करायला सांगितलं. सामन्यापूर्वी पंखुरी खूपच टेन्शनमध्ये होती. हार्दिक जिंकला आहे, पण मोठ्या भाऊ जिंकला नाही. या सामन्यामध्ये गुजरातने लखनऊचा 56 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कृणाल पांड्या गोल्डन डक ठरला.

दरम्यान, लखनऊ संघाचा 56 धावांनी गुजरात संघाने पराभव करत गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवलं होतं. शुबमन गिल नाबाद (94), वृद्धीमान साहा (81) आणि गोलंदाज मोहित शर्माच्या 4 विकेटस हे खेळाडू गुजरातच्या विजयाचे हिरो ठरलेले. गुजरातने विजयासाठी 228 धावांच टार्गेट दिलं होतं. लखनऊला 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 171 धावाच करत आल्या होत्या.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.