IPL 2023 MI vs RCB Live Streaming | मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी आमनेसामने, प्रतिष्ठेच्या सामन्यात विजय कुणाचा?
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Streaming | आरसीबी मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये हरवणार की पलटण बाजी मारणार? जाणून घ्या सामन्याबाबत सर्वकाही.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात मंगळवारी 9 मे रोजी 54 व्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यात आयपीएलमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात ही कडवी झुंज होणार आहे. रायव्हलरी वीक सुरु झाल्याने दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आरसीबी आणि मुंबईचा हा या हंगामातील दुसरा सामना असणार आहे. आरसीबीने मुंबईवर 2 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा या सामन्यात विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई विरुद्ध आरसीबी सामना कधी आणि कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 9 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्याचं आयोजन कुठे?
मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यातील हा महामुकाबला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात?
मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.
डिजीटल स्ट्रीमिंग कुठे बघता येईल?
क्रिकेट चाहत्यांना जिओ अॅपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहता येईल. विशेष म्हणजे क्रिकेट शौकीनांना 12 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम | विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, सिराज पटेल. कौल, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, वैशाक विजयकुमार, फिन ऍलन, सोनू यादव, मनोज भंडागे, शाहबाज अहमद, आकाश दीप, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा.