WTC Final 2023 | महाअंतिम सामन्याआधी प्लेइंग इलेव्हन जाहीर, पाहा कुणाला मिळाली संधी?
Icc Wtc Final 2023 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे.
मुंबई | टीम इंडिया आयपीएल 2023 या 16 व्या मोसमानंतर लंडनला रवाना होणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनल खेळणार आहे. या महाअंतिम सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याचं आयोजन हे 7 ते 11 जून दरम्यान करण्यात आलं आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाची WTC FINAL खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. टीम इंडियाला याआधी 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.त्यामुळे टीम इंडियाचं स्वप्न अधुरं राहिलं होतं.
मात्र आता टीम इंडिया पुन्हा सलग दुसऱ्यांदा WTC FINAL मध्ये पोहचली आहे. यंदा टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. दुसऱ्या प्रयत्नात टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी आपली WTC FINAL बेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे शास्त्री यांनी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही टीममधील खेळाडूंना निवडून प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. शास्त्री यांच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियापेक्षा जास्त ऑस्ट्रेलियाचे अधिक खेळाडू आहेत. या प्लेइंग इलेव्हमध्ये भारताचे 4 आणि ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू आहेत. शास्त्रींनी या टीमचा कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याचीच निवड केली आहे.
आयसीसीचं ट्विट
? EXCLUSIVE ?
?? x 7?? x 4
Ravi Shastri picks his @upstox Combined XI for the big #WTC23 Finale ?
— ICC (@ICC) May 22, 2023
सलामीची जबाबदारी ही रोहित शर्मा आणि उस्मान ख्वाजा यांच्याकडे आहे. मध्यक्रमात मानर्स लाबुशेन, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या तिघांचा समावेश आहे. सहाव्या क्रमांकावर ऑलराउंडर म्हणून रविंद्र जडेजा असणार आहे. सातव्या क्रमांकावर तर विकेटकीपर म्हणून एलेक्स कॅरी याला एन्ट्री मिळाली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या तिकडीची निवड केली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून नॅथन लायन हा एकमेव आहे.
रवि शास्त्री यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमधून शुबमन गिल, मोहम्मद सिराज, टॉड मर्फी, डेविड वॉर्नर, कॅमरून ग्रीन, उमेश यादव, ट्रेव्हिस हेड आणि रविचंद्रन अश्विन या खेळाडूंना डच्चू दिला आहे.
रवि शास्त्री यांची प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कप्तान), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, रविंद्र जडेजा, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि मोहम्मद शमी.