IPL 2023 Eliminator LSG vs MI Live Streaming | लखनऊ विरुद्ध मुंबईत क्वालिफायर 2 साठी चढाओढ, जाणून घ्या सर्वकाही
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Streaming | आयपीएल 2023 मोसमातील एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत.
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात प्लेऑफ फेरीला सुरुवात झालीय. या प्लेऑफमधील क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारी टीम थेट फायनलला पोहचेल. तर पराभूत होणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाविरुद्ध 2 हात करेल. एलिमिनेटर सामना बुधवारी 24 मे रोजी खेळवण्यात येईल. हा सामना जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये पोहचेल. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीमचा सामना होईल.
एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. लखनऊची एलिमिनेटर खेळण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. त्यामुळे या एलिमिनेटरमध्ये लखनऊ आणि मुंबई यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत आपण सर्वकाही जाणून घेऊयात.
लखनऊ विरुद्ध मुंबई एलिमिनेटर मॅच कधी?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर मॅच बुधवारी 24 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई एलिमिनेटर मॅच?
लखनऊ विरुद्ध मुंबई एलिमिनेटर मॅचचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स एलिमिनेटर मॅच किती वाजता सुरु होणार?
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस उडवण्यात येईल.
लाईव्ह मॅच टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर दिसणार?
लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
मोबाईल आणि लॅपटॉपवर मॅच पाहण्यासाठी काय करावं लागेल?
जिओ app च्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहता येईल. तसेच लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्याचे प्रत्येक अपडेट्स टीव्ही 9 मराठी वेबसाईटवरुन जाणून घेता येतील.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.