Pakistan Crisis : पाकिस्तानात भीषण स्थिती, उपाशी लोकांनी काय केलं, ते VIDEO मध्ये पहा
Pakistan Crisis : डोळ्यावर विश्वास नाही बसणार, इतकी भीषण अवस्था पाकिस्तानात आहे. एकदा VIDEO बघा. सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ समोर आलाय, ते दृश्य पाहून तुम्हाला धक्का बसेल.
लाहोर : मागच्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भीषण स्थिती (Pakistan Crisis) आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. पाकिस्तानातील जनतेला दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतोय. पाकिस्तानातील लोकांना जेवणासाठी आवश्यक असणारं पीठ सुद्धा मिळत नाहीय. पाकिस्तानातील लोकांची अन्न-पाण्याविना जी अवस्था झालीय, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोनवेळच्या जेवणासाठी पाकिस्तानात लोकांनी ट्रक लुटला होता.
सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ समोर आलाय, ते दृश्य पाहून तुम्हाला धक्का बसेल. टि्वटरवर शेयर केलेला हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचा दावा करण्यात आलाय. तिथल्या एका मार्केटमध्ये केळी विकण्यासाठी आलेल्या मुलाची गाडी लुटण्यात आली.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतय, एक लहान मुलगा केळ्याची गाडी घेऊन येतो. ते पाहून, स्थानिक लोक त्याला घेरतात. त्यानंतर लोक केळी विकत घेण्याऐवजी सरळ केळयांचे घड उचलून चालू लागतात. या मुलाच्या गाडीवर लुटमार केली जाते. आधी लोक त्या मुलाशी बोलले, नंतर केळ्याच घड उचलून चालू लागले. ते पाहून दुसऱ्या लोकांनी सुद्धा त्यांच अनुकरण केलं.
मुलगा रडतो. याचना करतो, पण कोणी त्याच ऐकत नाही. अखेर मुलगा आपलं माल वाचवण्यासाठी ती गाडी घेऊन पळू लागला. मात्र, तरीही लोकांनी लुटमार चालूच ठेवली.
A Mob in Pakistan steal from a kid selling bananas on his donkey cart ? pic.twitter.com/zSCQo4ILU4
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 7, 2023
वेरिफाइड अकाऊंटवरुन शेयर
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना पाकिस्तानच्या स्थितीवर दया येत आहे. पाकिस्तानात खूप वाईट स्थिती आहे. वस्तू विकत घेण्याऐवजी लोक लुटमारी करतायत. हा व्हिडिओ टि्वटर अकाऊंटवर @crazyclipsonly या वेरिफाइड अकाऊंटवरुन शेयर करण्यात आलाय. हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचा दावा करण्यात येतोय.