Mumbai Indians IPL 2023 : अखेर भिती होती, तेच घडलं, RCB विरुद्ध मॅचआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का
Mumbai Indians IPL 2023 : आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सामना आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. या सीजनमध्ये उर्वरित सर्व सामन्यात मुंबई इंडियन्सला किंमत चुकवावी लागू शकते.
मुंबई : अखेर भिती होती, तेच घडलय. आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला झटका बसला आहे. उर्वरित सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स समोरील आव्हान वाढणार आहेत. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना ज्याची भिती होती, तेच टीमसोबत घडलय. बऱ्याच दिवसांपासून मुंबई इंडियन्स टीमसोबत असं घडू शकतं, याची भिती व्यक्त केली जात होती. आधीच गोलंदाजीची टीमची बाजू कमकुवत आहे. मागच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी 200 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत.
त्यामुळे टीमच्या फलंदाजांवर दबाव येतो. मुंबई इंडियन्सने मागचे काही सामने गमावले, त्यामागे गोलंदाजी मुख्य कारण आहे. एक-दोन चांगल्या गोलंदाजांचा अभाव हे मुख्य इंडियन्सच्या पराभवामागीलल मुख्य कारण आहे.
अखेर शिक्कामोर्तब झालच
सीजन चालू होण्याआधी जसप्रीत बुमराहच्या रुपाने मुंबई इंडियन्सला धक्का बसला होता. बुमराह दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून आऊट झाला. आता त्याच जोफ्रा आर्चरची भर पडली आहे. जोफ्रा आर्चर आयपीएल 2023 मधून आऊट झालाय. वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन त्याची जागा घेईल. जॉर्डन सातत्याने मुंबई इंडियन्सकडून खेळत नव्हता, तेव्हाच तो टीमच्या बाहेर जाईल अशी भिती वर्तवली जात होती. आता यावर शिक्कामोर्तब झालय.
10 पैकी फक्त 5 सामने खेळलेला
IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत 10 सामने खेळलीय. त्यात जोफ्रा आर्चर फक्त 5 सामन्यात खेळला होता. तो सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सकडून सलग सामने खेळत नव्हता. तो उपचारासाठी बेल्जियमला गेला होता, असा सुद्धा एका रिपोर्टमधून खुलासा झाला. आता तो टुर्नामेंटमधून बाहेर गेल्यामुळे वास्तव सगळ्यांना समजलय.
????? ?????? ????? ?????? ???????
Chris Jordan will join the MI squad for the rest of the season.
Chris replaces Jofra Archer, whose recovery and fitness continues to be monitored by ECB. Jofra will return home to focus on his rehabilitation.… pic.twitter.com/wMPBdmhDRf
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2023
IPL 2023 मध्ये त्याच खराब प्रदर्शन
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2023 मध्ये जोफ्रा आर्चर आपला शेवटचा सामना 6 मे रोजी खेळला होता. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ही मॅच झाली. चेपॉकवर ही मॅच झाली होती. आर्चरला या सामन्यात एकही विकेट मिळाला नव्हता. मागच्या 5 सामन्यात त्याला आपल्या लौकीकाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. 5 मॅचमध्ये त्याने फक्त 2 विकेट घेतले होते.
बाहेर होण्यामागे आणखी एक कारण
जोफ्रा आर्चरच्या दुखापतीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाची नजर आहे. आर्चर बाहेर होण्यामागे आगामी Ashes सीरीज सुद्धा एक कारण आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारी Ashes टेस्ट सीरीज प्रतिष्ठेची मानली जाते. आर्चर Ashes सीरीजआधी फिट व्हावा, अशी इंग्लंडची इच्छा असेल. इंग्लंडला जाऊन आता त्याची रिहॅब प्रोसेस सुरु होईल.
तो बाहेर, जॉर्डन इन
मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला आयपीएल 2023 साठी रिटेन केलं होतं. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला 8 कोटी रुपये मोजून मुंबई इंडियन्सने विकत घेतलेलं. पण दुखापतीमुळे तो मागचा संपूर्ण सीजन खेळू शकला नाही. त्याची जागा ख्रिस जॉर्डनने घेतली आहे. त्याने 2016 मध्ये आयपीएल डेब्यु केला होता. इंग्लंडसाठी 87 T20 सामन्यात जॉर्डनने 96 विकेट घेतलेत. आयपीएलमध्ये त्याच्याकडे 28 सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने 27 विकेट घेतलेत.