IPL 2023 Playoff : प्रत्येक डॉट बॉलमागे का दिसतेय झाडाचं चित्र, जाणून घ्या यामागचं कारण
CSK vs GT, IPL 2023 Playoffs : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफ राउंड सुरु झाला आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या सामन्यात स्क्रिनवर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. डॉट बॉलच्या ठिकाणी झाडांचं चित्र दिसत आहे. त्यामागचं कारण जाणून तुम्ही बीसीसीआयचं कौतुक कराल.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफच्या पहिल्या क्वॉलिफायर राउंडमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातने चेन्नईला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही जोडी मैदानात उतरली. पण स्क्रिनवर काही वेगळंच चित्र दिसत होत. जसं डॉट बॉल पडत होता तसं झाडांचं चित्र दिसत होतं. एरव्ही डॉट बॉलच्या इथे शून्य दिसायचा मात्र झाडांचं चित्र का? असा प्रश्न सर्वांनाच पडला. साखळी फेरीतील सामन्यात तर असं काही नव्हतं. मग अचानक असं का झालं असावं? असा प्रश्न अनेकांना पडले होता. या चित्रामागे बीसीसीआयची जबरदस्त योजना आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.
बीसीसीआयने आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये टाकल्या गेलेल्या प्रत्येक डॉट चेंडूवर 500 झाडं लावण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे टीव्ही स्क्रिनवर प्रत्येक डॉट चेंडूवर झाड दिसत आहे. बीसीसीआयच्या या कल्पनेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Koi bhi Rutu ho, Raj sirf inka hota hai ✨?#Qualifier1 #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @chennaiipl pic.twitter.com/blwfQWDQAW
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
चेन्नईचा डाव
चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. ऋतुराज गायकवाडने 44 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. त्याला डेव्हॉन कॉनवेची चांगली साथ मिळाली. त्याने 34 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. शिवम दुबे काही खास करू शकला नाही. अवघी एक धाव करून तंबूत परतला. अजिंक्य रहाणने 10 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. तर अंबाती रायडू 9 चेंडूत 17 धावा करून परतला. रवींद्र जडेजा 22 आणि एमएस धोनी अवघी 1 धाव करून तंबूत परतले.
Why are they using tree icon for dot ball? pic.twitter.com/PllpspWquZ
— Tanay (@liveonchocos) May 23, 2023
गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येक 2 गडी बाद केले. तर दर्शन नलकांडे, राशीद खान, नूर अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश थेक्षाना.