LSG vs MI Eliminator | लखनऊ विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता
प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या टीमसाठी एलिमिनेटरमध्ये जिंकावं लागेल. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार?
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात बुधवारी 24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकणारी टीम थेट क्वालिफायर 2 मध्ये पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या टीमला पॅकअप करावं लागेल. या सामन्यानिमित्ताने आपण पिच रिपोर्ट आणि हवामान कसं असेल, पाऊस होण्याची शक्यता आहे का, हे जाणून घेऊयात.
लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्या होणाऱ्या सामन्यात क्रिकेट चाहते हे हवामानामुळे चिंतेत आहेत. लखनऊ विरुद्ध मुंबई या सामन्यात पाऊस होईल का अशी चिंता तुम्हाला सतावत असेल, तर आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगणार आहोत. चेन्नईत 24 मे रोजी चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण चेन्नईत सामन्याच्या दिवशी पाऊसाची काडीमात्र शक्यता नाही. चेन्नईत बुधवारी वातावरण सामान्य राहिल.
पिच रिपोर्ट
चेपॉक स्टेडियम ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. तर फलंदाजांना धावांसाठी इथे संघर्ष करावा लागू शकतो. या मैदानात पहिल्या डावात सरासरी 163 धावा होतात. आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 4 वेळा दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झालाय. मात्र पहिले बॅटिंग करणाऱ्या संघांचा सर्वाधिक वेळा विजय झाला आहे.
सामना रद्द झाल्यास काय होणार?
या सामन्यात पावसाची शक्यता नाहीच. मात्र हवामानाचं काही सांगता येत नाही. हा सामना पावसामुळे रद्द झालाच तर कोणती टीम क्वालिफायरमध्ये पोहचेल, हे आपण जाणून घेऊयात.
पॉइंट्स टेबलमध्ये लखनऊ 16 पॉइंट्ससह तिसऱ्या आणि मुंबईही 16 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र मुंबईच्या तुलनेत लखनऊचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे या निकषावर लखनऊला क्वालिफाय 2 मध्ये प्रवेश मिळेल.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.