GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 | आज ऋतुराज गायकवाड चांगला खेळला नाही, तर चेन्नईचा जास्त फायदा का?
GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 | तुम्ही म्हणाल ऋतुराज चांगला खेळतोय. मग त्याला का विसरायचं?. त्यामागे कारण आहे. खरंतर ऋतुराज गायकवाड या सीजनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
चेन्नई : IPL 2023 मध्ये ऋतुराज गायकवाड दमदार बॅटिंग करतोय. चेन्नई सुपर किंग्सला डेवॉन कॉनवेच्या साथीने तो दमदार सुरुवात देतोय. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. आता फायनलच्या तिकिटासाठी लढाई आहे. हे फायनलच तिकिट मिळवण्यासाठी CSK ला ऋतुराज गायकवाडला विसराव लागेल. तुम्ही म्हणाल असं का?. त्यामागे कारण आहे, ऋतुराज गायकवाडचे आकडे. याच आकड्यांनी CSK ला गुजरात टायटन्स विरुद्ध विजयापासून रोखलय.
आतापर्यंत तीनवेळा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम आमने-सामने आलीय. या तिन्ही सामन्यात ऋतुराज गायकवाडने CSK साठी हाफ सेंच्युरी झळकवली. पण त्याच एकही अर्धशतक CSK च्या फायद्याच ठरलं नाही. तिन्हीवेळा CSK चा पराभव झाला.
ऋतुराज CSK विरुद्ध असा फेल ठरला
IPL 2022 मध्ये पुण्यात पहिल्यांदा सीएसके आणि गुजरात टायटन्स आमने-सामने आले. त्यावेळी ऋतुराजने 48 चेंडूत 73 धावा बनवल्या. या मॅचमध्ये CSK चा 3 विकेटने पराभव झाला. त्याच सीजनमध्ये मुंबईत दुसऱ्यांदा दोन्ही टीम्समध्ये सामना झाला. त्यावेळी गुजरात विरुद्ध ऋतुराजने 49 चेंडूत 53 धावा केल्या. पण CSK चा 7 विकेटने पराभव झाला. IPL 2023 मध्ये पुन्हा दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या. त्यावेळी ऋतुराजने 50 चेंडूत 92 धावा केल्या. पण CSK ने हा सामना 5 विकेटने गमावला.
म्हणून ऋतुराजला विसरा
गुजरात टायटन्स विरुद्ध ऋतुराज गायकवाडने 3 सामन्यात 218 धावा केल्या. पण या धावा टीमच्या फायद्याच्या ठरल्या नाहीत. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे. प्रत्येकवेळी ऋतुराज गुजरात विरुद्ध दमदार खेळतो. पण टीम हरते. कदाचित यावेळी ऋतुराजने दमदार प्रदर्शन केलं नाही, तर त्यात CSK च हित असेल. IPL मध्ये डेब्यु केल्यानंतर गुजरात टायटन्सचा चेन्नईमध्ये हा पहिला सामना असेल. चेन्नई CSK च होम ग्राऊंड आहे. त्याचा फायदा त्यांना मिळणार.