MI Playoff IPL 2023 : ‘RCB अजून तू अंड्यात, बच्चा’ मुंबईच्या प्लेऑफ प्रवेशानंतर RCB चा खिल्ली उडवणारा Video Viral

MI Playoff IPL 2023 : मुंबईच्या फॅन्सनी हा व्हिडिओ नक्की बघावा, पण RCB फॅन्सनी हा व्हिडिओ पाहू नये. खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुंबईचे फॅन्स आरसीबी चाहत्याची खिल्ली उडवताना दिसतायत.

MI Playoff IPL 2023 : 'RCB अजून तू अंड्यात, बच्चा'  मुंबईच्या प्लेऑफ प्रवेशानंतर RCB चा खिल्ली उडवणारा Video Viral
MI Playoff IPL 2023Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 8:29 AM

मुंबई : IPL 2023 मध्ये रविवारचा दिवस खूप महत्वाचा होता. कारण या दिवशी प्लेऑफमध्ये दाखल होणारा चौथा संघ कुठला? ते ठरणार होतं. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादमध्ये झाला. दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा झाला. मुंबईला प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी SRH वर मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक होतं. मुंबईला हैदराबादवर मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नाही. पण त्यांनी सामना जिंकला.

त्यानंतर त्याचदिवशी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्समध्ये होणाऱ्या सामन्यावर RCB आणि मुंबईच्या फॅन्सचे डोळे लागले होते. कारण बँगलोरने गुजरातवर विजय मिळवला, तर RCB प्लेऑफमध्ये प्रवेश करणार होती, आणि ते हरले, तर मुंबईची टीम प्लेऑफमध्ये जाणार होती.

अखेर दुसरी शक्यता खरी ठरली

अखेर दुसरी शक्यता खरी ठरली. गुजरातने RCB ला हरवलं, त्यामुळे मुंबईची टीम प्लेऑफमध्ये गेली. या विजयाने मुंबईचे चाहते खूप आनंदात आहेत. पण RCB चे फॅन्स मात्र खूपच निराश आहेत. सामना गमावल्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद सिराजचे डोळे पाणावले. RCB हा स्टार प्लेयर्सनी भरलेला संघ आहे. पण मागच्या 15 वर्षात त्यांना एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

शुभमन गिलचही वाईट चिंतन

ट्रॉफीशिवाय आता त्यांचं हे 16 व वर्ष असणार आहे. RCB च्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला होता. आरसीबीचे काही चाहते इतके खवळले होते की, त्यांनी शुभमन गिलचही वाईट चिंतन केलं. कारण शुभमन गिलच्या शतकी खेळीने आरसीबीची विजयाची संधी हिरावली. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचे चाहते मात्र खूप आनंदात होते. ‘तुमचं सगळ विराट कोहलीच्या जीवावर’

असाच एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुंबईचे फॅन्स आरसीबी चाहत्याची खिल्ली उडवताना दिसतायत. तुमचं सगळ विराट कोहलीच्या जीवावर चाललय असं सुद्धा त्या चाहत्याला सुनावतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने सर्वांच लक्ष वेधून घेतलय.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.