Central Government : वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अगोदरच मिळणार पूर्वसूचना, पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी

पावसाळ्यातील धोका लक्षात घेता हे अॅप विकसित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे विकसित केले असून हे अॅप जीपीएस लोकेशनद्वारे काम करीत आहे. वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे आपल्या अॅपमध्ये सभोवताली वीज पडत असल्याच्या सुचना मिळतात.

Central Government : वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अगोदरच मिळणार पूर्वसूचना, पावसाळ्यात 'अशी' घ्या काळजी
'दामिनी अॅप' द्वारे वीज पडण्याअगोदर 15 मिनिट पूर्वसूचना मिळणार आहेत
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 1:06 PM

मुंबई : पावसाळ्यात (Rain Season) पावसापेक्षा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचाच धोका अधिक असतो. (Lightning) वीज पडण्याच्या घटनांमुळे मनुष्यहानी तर होतेच त्याचबरोबर मुक्या जनावरांना देखील आपला जीव गमवावा लागतो. या सर्वांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने एक मोबाईल अॅप विकसित केले आहे ज्याचे नाव(Damini App) ‘दामिनी अॅप’ असून या अॅपद्वारे वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अलर्ट दिला जात असल्याचे मंत्रालयाच्या माध्यमातून स्पष्ट कऱण्यात आले आहे. एवढेच नाही तर हे अॅप शासकीय कर्मचाऱ्यांना डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कर्तव्यावर असणारे कर्मचारी तसेच शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचीही सुरक्षा होणार आहे. हे ‘दामिनी अॅप’ गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घेता येणार आहे.

अशी मिळणार पूर्वसूचना..

पावसाळ्यातील धोका लक्षात घेता हे अॅप विकसित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे विकसित केले असून हे अॅप जीपीएस लोकेशनद्वारे काम करीत आहे. वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे आपल्या अॅपमध्ये सभोवताली वीज पडत असल्याच्या सुचना मिळतात. त्यामुळे आपण सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. अशावेळी मात्र कोणत्याही झाडाचा आसरा घेऊ नये अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या अॅपमुळे शेतामध्ये काम करणाऱ्या मजुर, शेतकरी यांची होणारी जिवितहानी टाळता येणार आहे.

शासकीय कर्माचाऱ्यांकडून जनजागृतीचे काम

हे अत्याधुनिक पध्दतीचे मोबाईल अॅप बनविण्य़ात आले असले तरी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यावरच सरकारचा उद्देश साध्य होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांनी हे अॅप डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल सहाय्यक यांनी अॅपचा वापर तर करायाचाच पण इतरांनाही याबाबत प्रवृत्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अॅप

ऊन,वारा आणि पावसामध्येही शेतकरी हे राबत असतात. दरवर्षी विज पडून झालेल्या दुर्घटनांनध्ये एकतर शेतकरी किंवा पशूंचा समावेश आहे. त्यामुळे हे अत्याधुनिक असलेले अॅप शेतकऱ्यांसाठीच अधिक उपयोगीचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राबणारी प्रशासकीय मंडळी यांनी सर्वात प्रथम शेतकऱ्यांना या अॅप बद्दल अचूक माहिती देणे गरजेचे आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.