Kharif Season : धक्कादायक ..! हंगामापूर्वीच सोयाबीनचे 37 हजार क्विंटल बियाणे चाचणीत ‘फेल’

ऐन हंगामात बियाणे कमी पडू नये म्हणून वर्षभरापासून प्रमाणीत बियाणांसाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षीच्या खरिपातून 26 हजार हेक्टरावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये सोयाबीन हे सर्वाधिक होते. तब्बल 25 हजार 86 हेक्टरावरील सोयाबीन होते. बियाणांसाठी निवडलेले सोयाबीन किंवा इतर पिके ही प्रमाणीकरण कार्यालयात पाठवले जातात.

Kharif Season : धक्कादायक ..! हंगामापूर्वीच सोयाबीनचे 37 हजार क्विंटल बियाणे चाचणीत 'फेल'
बियाणे
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 12:20 PM

परभणी : बियाणांची उगवण क्षमता तापसण्यासाठी (Seed Production) बिजोत्पादन ही प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये जर बियाणांची उगवण क्षमता चांगली असेल तरच बियाणे पेरणीसाठी परवानगी दिली जाते. पण (Parbhani Division) परभणी विभागातील पाच जिल्ह्यातील बियाणे उत्पादकांबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. (Seed) बियाणे उत्पादकांचे सोयाबीनचे 58 हजार 250 क्विंटल बियाणे हे उगवण क्षमतेमध्ये पास झाले आहे तर दुसरीकडे 37 हजार क्विंटल बियाणे हे नापास झाले आहे. असे असले तरी 49 हजार 6-7 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. परभणी येथील बीज प्रमाणीकरण कार्यालयांतर्गत उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

26 हजार हेक्टरावरील बीजोत्पादनचा कार्यक्रम

ऐन हंगामात बियाणे कमी पडू नये म्हणून वर्षभरापासून प्रमाणीत बियाणांसाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षीच्या खरिपातून 26 हजार हेक्टरावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये सोयाबीन हे सर्वाधिक होते. तब्बल 25 हजार 86 हेक्टरावरील सोयाबीन होते. बियाणांसाठी निवडलेले सोयाबीन किंवा इतर पिके ही प्रमाणीकरण कार्यालयात पाठवले जातात. यामध्ये सोयाबीनचे तब्बल 37 हजार क्विंटल तपासणीमध्ये फेल झाले. उगवण क्षमतेमध्येच बियाणे फेल निघाले योग्य वेळी तपासणी झाली अन्य शेतकऱ्यांचे नुकसान अटळ होते.

कशामुळे बियाणे झाले फेल?

उगवण क्षमता वाढण्यासाठी बियाणेच महत्वाचे. दर्जेदार सोयाबीनवरच उगवण क्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे विविध संस्थांकडून जरी बियाणे पुरवठा केला जात असला तरी त्याची आगोदर उगवण क्षमता तपासणे हे अनिवार्यच आहे. या तपासणीमुळे शेतकऱ्यांची समस्या मिटणार आहे. मात्र, गतवर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे सडलेले सोयबीन याचाच हा परिणाम आहे. पावसामध्ये सोयाबीन भिजले आणि त्याचा दर्जा ढासळला होता. परभणी विभागात सर्वाधिक बियाणे अयशस्वी ठरले हिंगोली जिल्ह्याचे. पावसानंतर योग्य ती निघराणीच झाली नाही.

हे सुद्धा वाचा

विविध संस्थाकडून बियाणे प्रमाणीकरणासाठी

खरिपातील सरासरी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा अंदाज घेता खरिपातील काढणी कामे सुरु झाले की बीजोत्पादनासाठी यंत्राना राबली जाते. त्यानुसारच राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृषी विद्यापीठ, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून बियाणे प्रमाणीकरणासाठी परभणी येथील कार्यालयात आणण्यात आले होते. असे असताना सोयाबीनचे अधिकचे बियाणे हे फेल झाले आहे. असे असले तरी बियाणांची टंचाई भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.