Soybean Crop : हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनला उतरती कळा, उन्हाळी सोयाबीनचे करायचे काय?

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 5 हजार 800 असा दर होता. उत्पादन घटूनही दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीस भर दिला. त्यामुळे मागणी वाढली आणि 5 हजार 800 वर असलेले सोयाबीन दोनच महिन्यात 7 हजार 300 पर्यंत गेले होते. त्यानंतर सोयाबीनचे दर तीन महिने 7 हजारच्यावर होते. हंगाम संपल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने व खरीप पेरणीसाठी बी बियाणे, खतांसाठी होणाऱ्या खर्चाची तजवीज म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती.

Soybean Crop : हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनला उतरती कळा, उन्हाळी सोयाबीनचे करायचे काय?
हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 10:43 AM

लासलगाव : यंदाच्या हंगामात (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार पाहवयास मिळालेले आहेत. सोयाबीन दरावर सर्वाधिक प्रभाव राहिला तो शेतकऱ्यांच्या भूमिकेचा आणि (Central Government) केंद्र सरकारचा. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल 750 रुपयांची घसरण झाली आहे. केंद्राने सोयापेंड आयातीला दिलेली परवानगी आणि खाद्यतेलावरील हटवलेले आयात शुल्क याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. यातच आता (Summer Crop) उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची विक्री की साठवणूक हा देखील मोठा मुद्दा उपस्थित झाला आहे. सध्या लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 440 असा दर मिळत आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असतानाही घटत्या दरामुळे शेतीमाल विकणे मुश्किल झाले आहे.

शेतकऱ्यांचा अखेरचा निर्णयही फसला

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 5 हजार 800 असा दर होता. उत्पादन घटूनही दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीस भर दिला. त्यामुळे मागणी वाढली आणि 5 हजार 800 वर असलेले सोयाबीन दोनच महिन्यात 7 हजार 300 पर्यंत गेले होते. त्यानंतर सोयाबीनचे दर तीन महिने 7 हजारच्यावर होते. हंगाम संपल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने व खरीप पेरणीसाठी बी बियाणे, खतांसाठी होणाऱ्या खर्चाची तजवीज म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. मात्र, केंद्राने घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहेत. सोयापेंडची आयात आणि खाद्यतेलावरील हटवलेले शुल्क याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने सोयाबीनची साठवणूक केली तो उद्देश साध्य झाला नाही.

अशी झाली सोयाबीनच्या दरात घसरण

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 3 हजार 800 रुपये असा दर होता तर जास्तीत जास्त 6 हजार 500 व सरासरी 6 हजार 440 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळाला. सोयाबीन दरात 750 रुपयांची पंधरा दिवसात घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातवरण निर्माण झाले. हंगामाच्या मध्यावर सोयाबीनला सर्वाधिक 7 हजार 300 असा दर होता. पण अंतिम टप्प्यात सर्वकाही पुर्ववद होते की काय अशी शंका आहे. सोयाबीनचे दर वाढले पण कापसाप्रमाणे टिकून राहिले नाहीत.

हे सुद्धा वाचा

उन्हाळी सोयाबीनची साठवणूकच

यंदा पोषक वातावरणामुळे पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर भर दिला होता. पोषक वातावरण आणि पाणी पुरवठा जोमात झाल्याने उत्पादनातही वाढ झाली. असे असले तरी बाजारपेठेत सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरज असेल तरच विक्री करावी अन्यथा साठवणूक करण्याचा सल्ला व्यापारी अशोक अग्रावाल यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.