New Parliament Building Inauguration LIVE : नवीन संसद भवन हे जगाला भारताच्या दृढ संकल्पाच संदेश देणारं मंदिर – पंतप्रधान
New Parliament Building Inauguration LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या संसदेचं उद्घाटन करणार आहेत. सकाळी सव्वासात वाजल्यापासून हा सोहळा सुरू होणार आहे. मात्र, विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच हा भव्य सोहळा सुरू होणार आहे. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार होणार आहे. उद्घाटन समारंभ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 7.15 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत पूजा होईल. त्यानंतर 11.30 वाजल्यापासून उद्घाटन समारंभ होणार आहे. या सोहळ्याला सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर हा सोहळा होत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई : संसद भवनावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ
सोहळ्याला वादाची किनार लागली नसती तर बरं झालं असतं
लोकशाही टिकवण्यासाठी झटलेल्यांचे केले अभिनंदन
-
नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांचा संसद भवनात प्रवेश
खासदार नवनीत राणा यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन केला प्रवेश
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे केलं अभिनंदन
हा दिवस आपल्या सर्व देशवासीयांसाठी ऐतिहासिकदृष्ट्या अविस्मरणीय आहे अशी भावना
-
-
राहुल गांधींची ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींवर टीका
मी भारताच्या आवाजासाठी लढतोय, कोणतीही किंमत मोजायला तयार – राहुल गांधी
संसद भवनाच्या उद्धाटनाला पंतप्रधान राज्यभिषेक समजत आहेत – राहुल गांधी
-
भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदींचं अभिवादन
भाषण संपल्यानंतर संसदेत उपस्थित असलेल्यांजवळ जाऊन पंतप्रधान मोदींचं अभिवादन
-
विकसनशील भारताला विकसित भारत बनवायचं आहे- पंतप्रधान मोदी
भारताचं यश आगामी काळात अनेक देशांसाठी प्रेरणा असेल- पंतप्रधान मोदी
विकसनशील भारताला विकसित भारत बनवायचं आहे- पंतप्रधान मोदी
भारताची जबाबदारी आता वाढली आहे- पंतप्रधान मोदी
लक्ष्य कठीण पण भारताची ताकद मोठी! – पंतप्रधान मोदी
-
-
भाजपची 9 वर्षे नवनिर्माणाची- पंतप्रधान मोदी
9 वर्षात 4 कोटी गरिबांना घरं – पंतप्रधान मोदी
नवं भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षी- पंतप्रधान मोदी
भाजपची 9 वर्षे नवनिर्माणाची- पंतप्रधान मोदी
9 वर्षात 11 कोटी शौचालयं बांधली – पंतप्रधान मोदी
-
मोदींकडून उज्ज्वला, आवास शौचालय, रस्त्याच्या कामांचा उल्लेख
भाजप सरकारची 9 वर्षे ही नवनिर्माणाची – पंतप्रधान मोदी
मोदींकडून उज्ज्वला, आवास शौचालय, रस्त्याच्या कामांचा उल्लेख
नव्या संसदेसोबतच 30 हजार पंचायत भवन उभारले – पंतप्रधान मोदी
-
नव्या संसद भवनात संस्कृती परंपरेसह आधुनिकतेचं मिश्रण – पंतप्रधान मोदी
नव्या भारतानं गुलामीला झुगारून टाकलं- पंतप्रधान मोदी
नवं संसद भवन श्रेष्ठ भारताचं प्रतीक- पंतप्रधान मोदी
नव्या संसद भवनात संस्कृती परंपरेसह आधुनिकतेचं मिश्रण- पंतप्रधान मोदी
-
नवं भवन स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम- पंतप्रधान मोदी
देशाचं भविष्य उज्ज्वल करणारी वास्तुही नवीन हवी- पंतप्रधान मोदी
पवित्र सेंगोलला आपण त्याचा मान मिळवून दिलाय- पंतप्रधान मोदी
-
संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे- पंतप्रधान मोदी
जग भारताकडे उमेदीने पाहतंय- पंतप्रधान मोदी
आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे – पंतप्रधान मोदी
लोकशाही फक्त व्यवस्था नाही तर संस्कार आणि परंपरा आहे- पंतप्रधान मोदी
-
लोकसभेत पवित्र सेंगोलची स्थापना झालीय
नवीन भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्ष. लोकसभेत पवित्र सेंगोलची स्थापना झालीय. जग आपल्या देशाकडे उमेदीन बघतय.
-
नवीन संसद भवन 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाच प्रतिबिंब
हे फक्त एक भवन नाही. 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाच प्रतिबिंब आहे. नवीन संसद भवन हे जगाला भारताच्या दृढ संकल्पाच संदेश देणारं मंदिर आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
प्रत्येक देशाच्या विकास यात्रेत काही क्षण असे येतात, जे कायमस्वरुपी अमर होतात. आज 28 मे 2023 चा दिवस असाच शुभअवसर आहे. देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृतमहोत्सव साजरा करतोय.
-
विविधतेत एकता हीच भारताची शक्ती – लोकसभा अध्यक्ष
विविधतेत एकता हीच भारताची शक्ती. नव्या संसेदच उद्धाटन ही अविस्मरणीय. मोदींमुळे कमीवेळेत संसद भवन तयार झालं. भारताची लोकशाही सर्वात जुनी – ओम बिर्ला
-
नवीन संसदेच उद्घाटन राष्ट्रपतींचा संदेश
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांना वाचून दाखवला.
#WATCH | Rajya Sabha Deputy Chairman Harivansh reads out a message of President Droupadi Murmu in the new Parliament building pic.twitter.com/8kupF9h0h8
— ANI (@ANI) May 28, 2023
-
मोदी संसद भवनाच्या उद्धाटनाला राज्याभिषेक समजतायत – राहुल गांधी
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट केलं आहे. त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्धाटनाला राज्याभिषेक समजतायत.
संसद लोगों की आवाज़ है!
प्रधानमंत्री संसद भवन के उद्घाटन को राज्याभिषेक समझ रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2023
-
कार्यक्रमाला कोण-कोण उपस्थित?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या लोकसभेमध्ये आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम सुरु आहे. संसदेचे सदस्य, विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित आहेत.
#WATCH | PM Modi in the new Lok Sabha, ceremony begins with National Anthem
Members of Parliament, CMs of different States and other dignitaries present pic.twitter.com/mFZoiigvQ8
— ANI (@ANI) May 28, 2023
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात मोदी देशाच्या संसदेला संबोधित करतील.
-
संसद भवनाच्या उद्घाटनाला गैरहजर राहणं हे दुर्दैवी- एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोर कोणी आव्हान निर्माण करू शकत नाही
जे सावरकरांचे हिंदुत्व सातत्याने सांगत असतात तेच आज गैरहजर आहेत.
संसद भवनाच्या उद्घाटनाला गैरहजर राहणं हे दुर्दैवी आहे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला सुनावले
-
हा तर लोकशाहीला विरोध – फडणवीस
नवीन संसद भवनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीला विरोध!
देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
नवीन संसद भवनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीला विरोध!नए संसद भवन का विरोध करने का निर्णय मतलब लोकतंत्र का विरोध! #NewParliamentBuilding pic.twitter.com/osY29H9PDi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2023
-
रुसवे फुगवे नको- संजय शिरसाठ
नव्या संसदेचे उदघाटन देशासाठी गौरवाची गोष्ट. आघाडीच्या वेळेस निमंत्रण येत नव्हते संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण आले नाही म्हणून रुसवे फुगवे धरून चालणार नाही त्यात बसून काम करायचे आहे, असे मत संजय शिरसाठ यांनी व्यक्त केले.
-
नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्वाचं ट्विट
नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन होतंय
आज सकाळी सर्वधर्मीय पद्धतीने पूजा करत सेंगोलची स्थापना करण्यात आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे फोटो शेअर केले आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात…
As the new building of India’s Parliament is inaugurated, our hearts and minds are filled with pride, hope and promise. May this iconic building be a cradle of empowerment, igniting dreams and nurturing them into reality. May it propel our great nation to new heights of progress. pic.twitter.com/zzGuRoHrUS
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2023
-
संसद भवनाचं उद्घाटन; सामनातून मोदी सरकारवर घणाघात
“दिल्लीत युद्धाचा प्रसंग, नव्या संसदेचे नवे मालक”
संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सामनातून मोदी सरकारवर घणाघात
आता दिल्लीत युद्ध छेडलं गेलंय
सामनातून मोदी सरकारवर घणाघात
-
नव्या संसदभवनाचं उद्घाटन; नितीन गडकरी यांच्याकडून ट्विट
नव्या संसदभवनाचं उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ट्विट
व्हीडिओ शेअर करत म्हणाले…
“ऐतिहासिक क्षण! वैदिक मंत्र उच्चारण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना केली”
ऐतिहासिक क्षण!
वैदिक मंत्र उच्चारण के साथ पीएम श्री @narendramodi जी ने नए संसद भवन में सेंगोल को स्थापित किया!#MyParliamentMyPride pic.twitter.com/DsnF2rbC6A
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 28, 2023
-
new parliament building inauguration : नितेश राणे यांचं ट्विट
देशाच्या नव्या संसदेचं आज उद्घाटन होतंय
भाजप नेते नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलंय
‘ऐतिहासिक क्षण’ म्हणत नितेश राणे यांनी ट्विट केलंय
नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली
याचा व्हीडिओ नितेश राणे यांनी शेअर केलाय
-
आनंदराव अडसूळ यांनी केले मोदींचे कौतूक
माजी खासदार आनंदराव अडसूळ
आजचा संसद भवनचा दिवस ऐतिहासिक आहे
कोण काय म्हणतं यानं काही फरक पडणार नाही
याची क्षमता फक्त मोदींमध्येच आहे
अळसूळ यांनी केले मोदींचे कौतूक
-
75 रुपयांचे नाणे जारी होणार
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा संदेश राज्यसभेचे उपसभापती देतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संदेशानंतर पीएम मोदी दुपारी 12.40 वाजता 75 रुपयांचे नाणे आणि स्टॅम्प जारी करतील. यादरम्यान पंतप्रधान मोदी नव्या संसदेतही संबोधित करणार आहेत. पीएम मोदी तीन ग्रुपसोबत फोटो सेशनही करतील. यामध्ये श्रमजीवी (75), गृहनिर्माण मंत्रालय आणि CPWD अधिकारी (60) आणि टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड (61) यांचा समावेश आहे.
-
उपराष्ट्रपतींना का बोलवले नाही- सुप्रिया सुळे
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनास राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींना बोलवले नाही
सरकारने राज्यसभेला डावलले, सुप्रिया सुळे यांचा आरोप
-
सुप्रिया सुळे यांनी केली टीका
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनास विरोधी पक्षाला फोन करायला हवे होते
सुप्रिया सुळे यांनी केले मत व्यक्त
मला जुनी वास्तू प्रिय, त्याच्या भींती बोलक्या
माझ्यासाठी लोकशाहीचे मंदिर जुनी बिल्डींग
सत्ताधारी लोक हा इव्हेंट करत आहेत
-
संसदेच्या लोकार्पणाचा दुसरा टप्पा १२ वाजता
नवीन संसदेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकर्पण १२ वाजता होत आहे.
लोकर्पण सोहळ्याची तयारी पूर्ण
सकाळी सर्वधर्मप्रार्थना अन् धार्मिक विधी झाला
१२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोंधन
-
संसद भवनासाठी गेले नागपूरहून सागवान लाकडू
संसद भवनाच्या बांधकामासाठी देशभरातून साहित्य गोळा करण्यात आले आहे. जसे नागपूरचे सागवान लाकूड, राजस्थानमधील सर्मथुरा येथील वाळूचा खडक, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील गालिचा, आगरतळा येथील बांबूचे लाकूड.
-
हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख धर्माची प्रार्थना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व कॅबिनेट मंत्री आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर नवीन संसदेत झालेल्या सर्वधर्म प्रार्थनेला उपस्थित
या सर्वधर्मीय मेळाव्यात हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख यासह अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी प्रार्थना केली
मोदींनी केला व्हिडिओ ट्विट
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाचं करणार लोकार्पण
सगळे खासदार 12 वाजता संसद भवनात जमणार
मोदींच्या उपस्थितीत पार पडणार लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
-
सेंट्रल हॉलमध्ये भाजप खासदार सावरकरांना आदरांजली वाहणार आहेत
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, थोड्याच वेळात भाजपचे खासदार जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमून वीर सावरकरांना आदरांजली वाहतील.
-
पंतप्रधान मोदी संसद भवनातून बाहेर पडले
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पंतप्रधान मोदी संसद भवनातून बाहेर पडले आहेत.
-
अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी प्रार्थना केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व कॅबिनेट मंत्री आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर लोक नवीन संसदेत सर्वधर्म सभेत उपस्थित आहेत. या सर्वधर्मीय मेळाव्यात बौद्ध, जैन, पारशी, शीख यासह अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी प्रार्थना केली.
-
पंतप्रधान मोदींनी संसद भवनाचे उद्घाटन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी पीएम मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. तामिळनाडूतील अधिनाम संतांनी धार्मिक विधीनंतर सेंगोल पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले होते, जे पंतप्रधान मोदींनी नवीन संसदेच्या लोकसभा इमारतीमध्ये स्थापित केले होते.
-
बांधकामात काम करणाऱ्या कामगारांचा गौरव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर इमारतीच्या बांधकामात काम करणाऱ्या कामगारांचा गौरव केला.
-
सर्वधर्मीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
देशाच्या नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर संसदेच्या आवारात सर्वधर्मीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विविध धर्मातील विद्वान व शिक्षकांनी आपापल्या धर्माविषयी विचार मांडून पूजा केली. यावेळी पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उपस्थित होते.
-
PM मोदी ‘सर्व-धर्म’ प्रार्थना समारंभात सहभागी
PM मोदी ‘सर्व-धर्म’ प्रार्थना समारंभात सहभागी
नवीन संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्व-धर्म’ प्रार्थना समारंभात पंतप्रधान मोदींसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते.
Delhi | PM Modi along with Lok Sabha Speaker Om Birla and Cabinet ministers attends a ‘Sarv-dharma’ prayer ceremony being held at the new Parliament building pic.twitter.com/lfZZpTDMHx
— ANI (@ANI) May 28, 2023
-
उद्घाटनापूर्वी संसद भवनात सर्वधर्मीय प्रार्थना
उद्घाटनापूर्वी संसद भवनात सर्वधर्मीय प्रार्थना
संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना केली जात आहे.
सर्व धर्माचे धर्मगुरू आपापल्या श्रद्धेचे मंत्र म्हणत आहेत.
-
नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले
नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हे सुध्दा उपस्थित होते.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नए संसद भवन का उद्घाटन किया। इस दौरान लोकसभा अध्यक्ष ओम बिरला भी मौजूद रहे। pic.twitter.com/dwFvUFoLf7
— ANI_HindiNews (@AHindinews) May 28, 2023
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित
आधी सेंगोलची संसदेत प्रतिष्ठापणा
-
नव्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंगोलची स्थापना
लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला सेंगोल स्थापित करण्यात आला
अधिनम मठाच्या संतांनी दिलं मोदींच्या हाती सेंगोल
मंत्रोच्चारात सेंगोलची मोदींच्या हस्ते स्थापना
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित
-
साधू महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती दिलं सेंगोल
पंतप्रधान मोदी सेंगोल घेऊन नव्या संसदेकडे रवाना
संगोलची नव्या इमारतीत प्रतिष्ठापणा होणार
अधिनम मठाच्या संतांनी दिलं मोदींच्या हाती सेंगोल
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महात्मा गांधी यांना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आल्यावर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली
यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते
त्यानंतर मोदी यांच्या हस्ते पूजा आणि हवन करण्यास सुरुवात झाली
#WATCH PM Modi and Lok Sabha Speaker Om Birla arrive at the new Parliament building for the inauguration ceremony pic.twitter.com/nHbfqFFYZh
— ANI (@ANI) May 28, 2023
-
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यास सुरुवात, पूजाविधी सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंडपात पूजेला बसले, मंत्रोच्चार सुरू
होम हवन केला जात आहे, धार्मिकविधीने उद्घाटन सोहळ्याला सुरुवात
PM Shri @narendramodi performs pooja at new Parliament House. #MyParliamentMyPride https://t.co/n92MWInrTH
— BJP (@BJP4India) May 28, 2023
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेत पोहोचले, थोड्याच वेळात उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेच्या पूजास्थळी दाखल
पूजा आणि होम हवनने कार्यक्रमाची सुरुवात होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संसदेकडे रवाना
-
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत
थोड्याच वेळात नव्या संसदेच्या इमारतीकडे रवाना होणार
शिंदे गटाचे खासदारही सोहळ्यासाठी उपस्थित राहणार
नवी दिल्लीतही साजरी होणार सावरकर जयंती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनात साजरी करणार जयंती
महाराष्ट्र सदनाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे
यंदापासून राज्य सरकार गौरव दिन म्हणून करणार साजरा
शिवसेनेचे सगळे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्रित संसद भवनात जाणार
खासदारांसोबत मुख्यमंत्र्यांचं असणार शक्तीप्रदर्शन
महाराष्ट्र सदनातून सगळे खासदार सावरकर जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत जाणार
सगळ्या खासदारांनी हजर राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या सूचना
-
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर 21 राजकीय पक्षांचा बहिष्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन करण्यात येणार नसल्याने 21 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
काँग्रेससह टीएमसी, डीएमके, आप, राष्ट्रवादी पार्टी, ठाकरे गट, समजावादी पार्टी, आरजेडी,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, इंडियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा,
नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि) राष्ट्रीय लोकदल, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, व्हिसीके, एमडीएके आदींनी बहिष्कार टाकला आहे
-
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला 25 राजकीय पक्ष उपस्थित राहणार
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला 25 राजकीय पक्ष उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला भाजप, शिवसेना (शिंदे), नॅशनल पीपुल्स पार्टी मेघालय, नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा,
जन नायक पार्टी एआईडीएमके, आईएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय,
मिजो नॅशनल फ्रंट, तमिल मानिला काँग्रेस, आयटीएफटी, बोडो पीपुल्स पार्टी पट्टाली मक्कल काची,
महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, अपना दल, असम गण परिषद, लोक जनशक्ति पार्टी (पासवान),
बीजेडी, बीएसपी, टीडीपी, वायएसआरपीसी, अकाली दल आणि जेडीएस आदी पक्ष उपस्थित राहणार आहेत
-
देशाला आज नवी संसद मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नव्या इमारतीचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे
आज सकाळी 7 वाजल्यापासूनच हा भव्य सोहळा सुरू होणार आहे
हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार होणार आहे
उद्घाटन समारंभ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे
पहिल्या टप्प्यात 7.15 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत पूजा होईल
त्यानंतर 11.30 वाजल्यापासून उद्घाटन समारंभ होणार आहे
या सोहळ्याला सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे
मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे
Published On - May 28,2023 6:21 AM