SC Hearing on MLA disqualification Live | सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, नक्की काय काय झालं?

| Updated on: Mar 15, 2023 | 6:12 AM

SC Hearing on MLA disqualification News Live : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर थोड्याच वेळात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून जोडपत्र सर्वोच्च न्यायलयात सादर करण्यात आल्याने या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्टात आज नेमकं काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

SC Hearing on MLA disqualification Live | सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, नक्की काय काय झालं?
Image Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलग दोन आठवडे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अनेक मुद्दे कोर्टासमोर मांडण्यात आले. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जोडपत्रं सादर केलं आहे. या जोडपत्रातून त्यांनी पाच मुद्द्यांवर कोर्टाचं लक्ष वेधलं आहे. त्यावर शिंदे गटाचे वकील काय प्रतिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीची अपडेट जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2023 04:02 PM (IST)

    SC on MLA disqualification Live | सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

    सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

    बुधवारी 15 मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार

    बुधवारी कपिल सिब्बल आणि तुषार मेहता युक्तिवाद करणार

    तुषार मेहता 1 तास युक्तिवाद करणार

    उर्वरित वेळेत कपिल सिब्बल युक्तिवाद करणार

  • 14 Mar 2023 03:07 PM (IST)

    आमदारांना मिळालेल्या धमकीवर जेठमलानींचा युक्तीवाद

    अपात्रतेची नोटीस फक्त 16 जणांविरोधातच- जेठमलानी

    काही आमदार परत येण्याच्या हेतूनं 16 जणांना नोटीस- जेठमलानी

    39 आमदारांमध्ये त्यांना गट पाडायचे होते- जेठमलानी

    मेरीटवर युक्तिवाद करण्याची कोर्टाची जेठमलानींना सूचना

    या गोष्टी मांडू नका, मेरीटवर युक्तिवाद करा- कोर्ट

    हरीश साळवे आणि तुमच्या युक्तिवादात विसंगती- कोर्ट

  • 14 Mar 2023 02:24 PM (IST)

    SC Hearing on Shiv sena MLA Live | सत्ता संघर्षावरील सुनावणीला लंचब्रेकनंतर पुन्हा सुरुवात

    सत्ता संघर्षाबाबत महत्वाची बातमी

    लंचब्रेकनंर सत्ता संघर्षावरील सुनावणीला सुरुवात

    घटनापीठ कोर्ट रुममध्ये दाखल

    सकाळपासून ही सुनावणी सुरु आहे

    एकूण 2 दिवस ही सुनावणी चालणार आहे

  • 14 Mar 2023 01:32 PM (IST)

    जुन्या पेन्शन योजनेसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शन योजनेसाठी धडकले शेकडो शासकीय कर्मचारी

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासकीय कर्मचाऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू

    भजन म्हणत केली जात आहे जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

    सगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

  • 14 Mar 2023 12:26 PM (IST)

    supreme court Hearing Live : विधानसभा अध्यक्षांकडेच पुन्हा हे प्रकरण सोपवावं; हरीश साळवे यांची मोठी मागणी

    मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांना स्वीकारावा लागला

    राजीनाम्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं

    बहुमत बळाच्या जोरावर झालं असं कसं म्हणता येईल

    जोपर्यंत अपात्र होत नाहीत, तोपर्यंत आमदार काम करू शकतात

    विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पद, 10 व्या शेड्यूल अंतर्गत येत नाही

    अविश्वास असेल तर बहुमत चाचणी होते. त्यात गैर काय

    बहुमत चाचणी बोलावून राज्यपालांनी काहीही चूक केलेलं नाही

    हरीश साळवे यांचा युक्तिवाद संपला

  • 14 Mar 2023 12:10 PM (IST)

    SC Hearing on Shiv sena MLA Live : अ‍ॅड. नीरज कौल यांचा जोरदार युक्तिवाद

    नवी दिल्ली : मुद्दा पक्षफुटीचा नव्हे पक्षांतर्गत वादाचा आहे.

    आमदारांनी विधिमंडळात बहुमताने निर्णय घेतले आहेत यात हस्तक्षेप करू नये.

    उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही मविआतून बाहेर पडत असल्याचे पत्र काही आमदारांनी दिले म्हणून राज्यपालांनी चाचणीचे आदेश दिले.

    पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे कोर्टाला नाही.

  • 14 Mar 2023 11:35 AM (IST)

    SC on MLA disqualification Live : बहुमत चाचणीचे आदेश देऊन राज्यपालांनी काहीही चूक केलं नाही; हरीश साळावे यांचा युक्तिवाद

    बहुमत चाचणी सभागृहातच केली जाते

    अविश्वास निर्माणण झाल्यास बहुमत चाचणी घेणं गैर नाही

    राजभवनात बहुमत चाचणी झाली नाही

    बहुमत नसल्याने विधानसभा उपाध्यक्षांनी आपलं पद गमावलं

    साळवे यांच्याकडून किहोटो, रेबिया, मणिपूर आणि बोम्मई प्रकरणाचा दाखला

  • 14 Mar 2023 11:26 AM (IST)

    SC Hearing on Shiv sena MLA Live : हरीश साळवे यांचा युक्तवाद

    हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरु केला

    अध्यक्षांना घटनात्मक अधिकारी आहे

    बहुमत चाचणी राजभवनात झाली नाही, सभागृहात झाली

    बहुमत नसल्याने उपाध्यक्षांनी आपले पद गमावले

  • 14 Mar 2023 10:58 AM (IST)

    SC Hearing on MLA disqualification Live : सत्तासंघर्षाच्या प्रकरणात 10 व्या शेड्युलचं उल्लंघन झालंय; खासदार अरविंद सावंत यांचा दावा

    10 व्या शेड्युलचं उल्लंघन झाल्याने आमदार अपात्र व्हायलायच हवेत

    सुप्रीम कोर्टाचा निकाल न्यायाच्या बाजूने लागावा एवढीच अपेक्षा आहे

    मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला

    मात्र आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय, निकाल हा न्यायाच्या बाजूने लागायला हवाय

    आम्ही अंधभक्त नाही की आधीच काय होईल सांगायला, अरविंद सावंत यांचा खोचक टोला

  • 14 Mar 2023 10:42 AM (IST)

    SC on MLA disqualification Live- सत्तासंघर्ष सुनावणी- कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंच मोठं वक्तव्य

    90 टक्के शक्यता आहे हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार

    राहुल नार्वेकरांकडे पुन्हा हे प्रकरण जाईल- सरोदे

    अपात्र आमदारांचं प्रकरण पुन्हा विधानसभेत जाणार ?

  • 14 Mar 2023 10:17 AM (IST)

    राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 2 दिवसांत संपणार?

    2 दिवसांत आज आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गट युक्तिवाद करणार

    उद्या दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार

    उद्याच सत्तासंघर्ष बाबतच्या निकालाची घोषणा होण्याची शक्यता

    निकाल राखून ठेवला जाणार ?

    घटनापीठातील न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी निकाल ?

    आज हरीश साळवे ऑनलाइन युक्तिवाद करण्याची शक्यता

  • 14 Mar 2023 10:06 AM (IST)

    राज्यातील सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जोडपत्रं सादर केलं आहे

    या जोडपत्रातून त्यांनी पाच मुद्द्यांवर कोर्टाचं लक्ष वेधलं आहे

    त्यावर शिंदे गटाचे वकील काय प्रतिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Published On - Mar 14,2023 10:01 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.