Maharashtra Breaking News Live : मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून 53 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

| Updated on: Mar 09, 2023 | 6:44 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून 53 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कसबा विधान सभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज सकाळी 11:45 वाजता मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाच्या धमकी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Mar 2023 08:35 PM (IST)

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून 53 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून 53 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

    महसूल गुप्तवार्ता ( डी आर आय ) संचालनालयाची मोठी कारवाई

    अडिस अबाबा वरून आलेल्या प्रवश्या कडून जप्त करण्यात आलं हेरॉईन

    ट्रोली बॅगमध्ये गुप्त कप्पा बनवून होत होती अमली पदार्थाची तस्करी

    ट्रॉली बॅगमधून ७.६ कीलोग्रम हेरॉईन जप्त

    प्रवश्याला कोर्टात हजर करण्यात आला असून १० तारखेपर्यंत डीआरआयच्या कोठडीत रवानगी

  • 08 Mar 2023 07:14 PM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 10 मार्चला पारनेर दौरा

    अहमदनगर :

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 10 मार्चला पारनेर दौरा

    राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 7 हजार सायकली वाटप तसेच शेतकरी मेळावाचे आयोजन

    मात्र पारनेर कारखाना कृती समिती करणार शरद पवार गो बॅक आंदोलन

    पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप

    पारनेर बचाव समितीने पवारांना लिहीलेल्या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकून पंचवीस सवाल उपस्थित केले

    या सवालांचा खुलासा दौर्‍यापूर्वी शरद पवारांनी करावा

    अन्यथा शरद पवार गो बॅक आंदोलन करणार पारनेर कारखाना बचाव कृती समितीचे रामदास घावटे यांचा इशारा

  • 08 Mar 2023 06:05 PM (IST)

    कसबा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली

    पुणे : 

    – कसबा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली,

    – मुरलीधर मोहोळ,मेधा कुलकर्णी,गणेश बिडकर,सिद्धार्थ शिरोळे आणि धीरज घाटे यांची नावं चर्चेत,

    – जगदीश मुळीक यांचा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असल्याने शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू,

    – महिनाभरात पुणे भाजपला नवा शहराध्यक्ष मिळण्याची शक्यता

  • 08 Mar 2023 02:28 PM (IST)

    Indian Railways : कसं ठरवलं जातं ट्रेनच नाव? 99 % लोकांना माहित नाही रेल्वेचा हा फॉर्म्युला

    Indian Railway Rule: इंडयिन रेल्वेकडे 9 हजार मालगाडया, 13 हजार रेल्वे गाडया आणि 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत. सध्या भारतीय रेल्वेचा, प्रवासी सुविधा वाढवण्यावर आणि रेल्वेच्या आधुनिकी करणावर जोर आहे. वाचा सविस्तर….

  • 08 Mar 2023 02:27 PM (IST)

    Women’s Day : पेशाने आर्किटेक्ट पण मल्लखांबासाठी ‘ती’ झटतेय दिवस-रात्र

    Women’s Day : आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण खेळासाठी झटणाऱ्या एका महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत. खरंतर आर्थिक सधनता असूनही या महिलेने हा निर्णय का घेतला? ते आपण जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर…..

  • 08 Mar 2023 02:22 PM (IST)

    VIDEO : 6,6,6,6, Mumbai Indians च्या स्टार बॅट्समनने पाकिस्तानी गोलंदाजाच्या उडवल्या चिंधडया

    एका ओव्हरमध्ये इतकं धुतलं की बॉलिंग विसरेल. एकदम लांब, लांब SIX मारले. वाचा सविस्तर….

  • 08 Mar 2023 01:16 PM (IST)

    आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

    नाशिक : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा

    2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत केलं होते आंदोलन

    आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर उगारला होता हात

    सरकारवाडा पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल

  • 08 Mar 2023 11:57 AM (IST)

    त्रिपुरा | माणिक साहा यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

    आगरतळा स्वामी विवेकानंद मैदानात पार पडला शपथविधी सोहळा

    शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित

  • 08 Mar 2023 11:33 AM (IST)

    पुण्यात आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

    पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदानींच्या विरोधात काँग्रेस करत आहे निषेध आंदोलन

    देशात महा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे

    याच विरोधात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत

  • 08 Mar 2023 11:10 AM (IST)

    Holi च्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूला मिळाली Good News, दुसऱ्यांदा बनला ‘पिता’

    Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा पिता बनलाय. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय. वाचा सविस्तर…..

  • 08 Mar 2023 11:00 AM (IST)

    कराड

    कोयना धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग वाढवणार

    सिंचनाची मागणी वाढल्यामुळे दुपारी कोयना धरणाचे नदी विमोचक उघडून 1500 क्युसेक्स पाणी विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार

    कोयना धरण पायथा विद्युत गृहातुन 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू

    एकूण 3600 क्युसेक्स विसर्ग होणार

    कोयना धरणाचा पाणीसाठा 67.05 TMCआहे

  • 08 Mar 2023 10:35 AM (IST)

    भारत राष्ट्र समितीच्या महिला नेत्याला ईडीकडून समन्स

    भारत राष्ट्र समितीच्या महिला नेत्याला ईडीकडून समन्स

    आमदार के कविता यांना ईडीकडून समन्स

    राजधानी दिल्लीतल्या दारू घोटाळ्याप्रकरणी समन्स

    9 मार्चला म्हणजेच उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

    के कविता या तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या कन्या आहेत

  • 08 Mar 2023 10:33 AM (IST)

    कराड

    कराड तालुक्यातील वनवासमाची येथे महिलेचा खून

    लता डी.के चव्हाण खून झालेल्या महिलेचे नाव

    महिलेच्या अंगावरील दागिने लुटून निर्घृण पणे खून

    तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल, मारेकऱ्याचा शोध सुरू

  • 08 Mar 2023 10:06 AM (IST)

    Harsha Bhogle : तिने मनातली गोष्ट बोलून दाखवली, हर्षा भोगलेंनी ‘ती’ इच्छा केली पूर्ण

    ‘ती’ सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये जे म्हणाली होती, ते हर्षा भोगले विसरले नव्हते. वाचा सविस्तर….

  • 08 Mar 2023 10:05 AM (IST)

    CSK टीममध्ये एकच वादा धोनी ‘दादा’, ज्यूनियर्स MS ला किती घाबरतात त्यासाठी हा VIDEO बघा

    धोनी तिथेच उभा होता, पण एकाची हिम्मत झाली नाही. वाचा सविस्तर….

  • 08 Mar 2023 09:50 AM (IST)

    चंद्रपूरमध्ये म्हशींच्या कळपावर वाघाचा हल्ला

    महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात म्हशींच्या कळपावर वाघाचा हल्ला,वाघाचा हल्ला cctv कॅमेरात कैद

    महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहून नेणारी पाईपलाईन आणि 400 केव्ही उपकेंद्राच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत झाला हल्ला

    विशेष म्हणजे वाघाने हल्ला करून एका पिल्लाला पकडले मात्र मागून इतर म्हशी धावून येत असल्याने घाबरून वाघाने काढला पळ

  • 08 Mar 2023 09:06 AM (IST)

    महिनाअखेरीस पुण्यातील भाजपा कार्यकारीणीत बदल होण्याचे संकेत

    पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार की भाजपा पुन्हा त्याचं नेतृत्वाला संधी देणार

    शहर, जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते

    मुदत संपली असल्यानं या महिना अखेरीस बदल होण्याची शक्यता आहे

    शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाव चर्चेत

    मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांन केली होती

    मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे

  • 08 Mar 2023 09:02 AM (IST)

    संभाजीनगरमध्ये 20 वर्षांपासून फरार असलेले तब्बल 700 गुन्हेगार जेरबंद

    संभाजीनगर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची मोठी कारवाई

    तब्बल 700 फरार गुन्हेगारांना केले अटक

    वेगवेगळे गुन्हे करून फरार झाले होते तब्बल 700 आरोपी

    प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र स्कॉड नेमून 700 आरोपींना अटक करण्यात यश

    700 आरोपींना अटक न्यायालयासमोर केले हजर

  • 08 Mar 2023 09:00 AM (IST)

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा लवकरच

    कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक

    केंद्रशासित प्रदेशाची घोषणा झाल्यावर पहिल्यांदाच होणार निवडणूक

    90 जागांसाठी होणार विधानसभा निवडणूक

    सुरक्षा दलांकडून आणि प्रशासनाकडून तयारीचा आढावा

    मतदार याद्या अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर

  • 08 Mar 2023 08:38 AM (IST)

    ते 2 डॉलर आणतील देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई

    रशियाकडून कच्चा तेलाच्या आयातीत 2 डॉलर प्रति बॅरलचा तेल कंपन्यांना फायदा

    देशातील वाहनधारकांना कधी होईल स्वस्त इंधनाचा पुरवठा

    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले इंधनावरील कर कपातीचे संकेत

    आजचा तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय, वाचा बातमी 

  • 08 Mar 2023 08:31 AM (IST)

    Jasprit Bumrah : Holi सणामध्ये जसप्रीत बुमराहबद्दल आली मोठी Good News

    Jasprit Bumrah injury update : भारतीय फॅन्सना सुखावणारी काय आहे ती बातमी? जसप्रीत बुमराहमुळे बीसीसीआय, टीम इंडिया सर्वच टेन्शनमध्ये होते. तो टीम इंडियाचा आधारस्तंभ आहे. एकहाती सामना फिरवण्यात कुवत असलेला तो खेळाडू आहे. वाचा सविस्तर….

  • 08 Mar 2023 08:31 AM (IST)

    WPL 2023 Points Table : हरमनप्रीत कौरची मुंबई कुठल्या स्थानावर? अन्य टीम्सची काय आहे स्थिती?

    Women’s Premier League (WPL) 2023 Standings Ranking: महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वच 5 टीम्सचे प्रत्येकी 2-2 सामने झाले आहेत. 2 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कुठली टीम कितव्या स्थानावर आहे ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….

  • 08 Mar 2023 08:10 AM (IST)

    संजय राऊत यांनी विधीमंडळाबाबत केलेल्या विधानाबाबत उद्या हक्कभंग समितीची दुपारी 4 वाजता बैठक

    विधानभवनातच होणार बैठक, काय कारवाई करायची यावर निर्णय होणार

    विधिमंडळाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव बुधवारी 1 मार्चला दाखल केला होता

    त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावून 48 तासांत लेखी म्हणणे मांडण्यासंदर्भात सांगितले होते

    पण अद्यापही संजय राऊतांनी हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर दिलेले नाही अशी माहिती आहे

    राऊतांच्या अडचणीत वाढ होणार की ते वेळ वाढवून मागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

  • 08 Mar 2023 07:50 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा बोजवारा

    पुणे : जिल्ह्यात शिवभजन थाळी योजनेला येणारी बीले दोन महिन्यांपासून थकली

    शिवभोजन थाळी योजनेला राज्य सरकारकडून अनुदान नाहीच

    पुणे जिल्ह्यात एकुण ३९ शिवभोजन थाळी केंद्र असुन या सगळ्या केंद्रांना १५ जानेवारी नंतर अनुदान नाहीच

    शिवभोजन योजना चालवणे केंद्रांना झाले कठीण

    काही ठिकाणी योजना निधी अभावी बंद करण्याची वेळ

    गेल्या दोन महिन्यात पुणे जिल्ह्यात तीन शिवभोजन थाळी केंद्र बंद

  • 08 Mar 2023 07:44 AM (IST)

    कोल्हापुरात पाटील-महाडिक गट आमने सामने

    कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद पात्रतेवरून पाटील -महाडिक गट आमने सामने

    राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1899 सभासद ठरले वैध

    सभासद अपात्रतेच्या सर्व हरकती प्रादेशिक साखर सहसंचालकांनी फेटाळल्या

    सभासद वैद्य ठरल्याने सत्ताधारी गट्टाविरोधात मोर्चे बांधणी करणाऱ्या सतेज पाटील गटाला मोठा धक्का

    शौमिका महाडिक यांच्या सभासदत्त्वावर घेतलेला आक्षेपही फेटाळला

    998 सभासदांच्या पात्रतेवर आक्षेप असताना 1899 सभासद वैध कसे ठरले

    सतेज पाटील गटाचा सवाल

  • 08 Mar 2023 06:27 AM (IST)

    कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार

    रवींद्र धंगेकर आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवारांची घेणार मुंबईत भेट

    उद्या रवींद्र धंगेकर यांचा शपथविधी

    आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन घेणार दर्शन

  • 08 Mar 2023 06:23 AM (IST)

    डोंबिवली पश्चिमेकडील सातपूल परिसरात धक्कादायक प्रकार

    दोन तरुणांवर काही तरुणांच्या टोळीकडून प्राणघातक हल्ला

    ओमकार माळी आणि अभिषेक भोईर अशी जखमींची नावे

    रंगपंचमीच्या सायंकाळी डोंबिवलीत राडा

    दहशत पसरवण्यासाठी तरुणावर हल्ला केल्याची माहिती

    दोन्ही जखमींवर शास्त्री नगर रुग्णालयात उपचार सुरू

    विष्णू नगर पोलिसांकडून तपास सुरू

  • 08 Mar 2023 06:22 AM (IST)

    वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याच्या प्रकरणी एकाला अटक

    मुंबईतून एकाला पुणे पोलिसांनी केली अटक, संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे

    आरोपीचं ओळख पटवण्याचं काम सुरू आहे

    वसंत मोरेंच्या मुलाला 30 लाख रुपये खंडणी प्रकरणात धमकी देण्यात आली होती

    भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरू आहे

  • 08 Mar 2023 06:19 AM (IST)

    नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

    जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील दोन दिवस सतर्क राहावे

    अहमदनगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    भारतीय हवामान खात्‍याने अहमदनगर जिल्‍हयात 7 ते 9 मार्च या कालावधीमध्‍ये पावसाची शक्यता वर्तवली

    विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा तसेच गारपीटीसह पाऊस होण्‍याची शक्‍यता

    जिल्ह्यातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले

  • 08 Mar 2023 06:15 AM (IST)

    कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

    कसब्यातून विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच धंगेकर यांची भेट घेणार

    यापूर्वी धंगेकर यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती

    धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केलाय

Published On - Mar 08,2023 6:10 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.