सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटला! पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Navi Mumbai Accident : सायन पनवेल महामार्गावरुन पनवेलच्या दिशेनं हा ट्रक चालला होता. मात्र क्षमतेपेक्षा जास्त सामाना या ट्रकमध्ये भरण्यात आलेलं.

सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटला! पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
वाहतुकीचा खोळंबाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 9:43 AM

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर (Sion Panvel Highway Traffic) ट्रक पलटी (Truck Accident) झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. सुदैवानं ट्रक पलटी होऊन कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याचा परिणाम वाहतुकीवर झालाय. ट्रक उलटल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पर्ववत करण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र वाहनांची मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी असलेली संख्या जास्त असल्यानं वाहतुकीचा (Traffic towards Panvel) बोजवारा उडाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या पलटी झालेला ट्रक हटवण्यात आला असला तरी या मार्गावरची वाहतूक ही अत्यंत संथ गतीनं सुरु आहे. मुंबई ठाण्याहून पनवेलच्या दिशेनं निघालेल्या वाहनांचा खोळंबा ट्रकच्या अपघातामुळे झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

का उलटला ट्रक?

सायन पनवेल महामार्गावरुन पनवेलच्या दिशेनं हा ट्रक चालला होता. मात्र क्षमतेपेक्षा जास्त सामानाया ट्रकमध्ये भरण्यात आलेलं. त्यामुळे या ट्रकचं संतुलन बिघडलं आणि ट्रक हायवेवरच पलटी झाला. ट्रकचा चालक यातून बालंबाल बचावलाय.

शनिवारी असल्यानं अनेक जण मुंबईबाहेर जाण्यासाठी सकाळीच निघाले होते. मात्र त्यांचा ट्रकच्या अपघातामुळे खोळंबा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. तब्बल तीन ते चार किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा सायन पनवेल महामार्गावर लागल्या होत्या. दरम्यान, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांकडूनही तातडीनं पावलं उचलण्यात आली.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

तूर्तास, सायन पनवेल महामार्गवर पलटी झालेला ट्रक हटवण्यात आला आहे. क्रेनच्या साहाय्यानं पोलिसांनी पलटी झालेला ट्रक हटवला आहे. मात्र तरिदेखील या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी निघालेल्यांना या अपघातामुळे मनस्तापाला सामोरं जावं लागलंय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.