Video: विरारच्या मनवेल पाडामध्ये भीषण अग्नितांडव! आगीत फर्निचरची 8 ते 10 दुकानं जळून खाक

Virar Fire : रात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी दिली आहे.

Video: विरारच्या मनवेल पाडामध्ये भीषण अग्नितांडव! आगीत फर्निचरची 8 ते 10 दुकानं जळून खाक
विरारमध्ये आगडोंबImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:52 AM

पालघर : विरार पूर्व (Virar News) येथील मनवेल पाडा परिसरात संत नगरमध्ये रात्री भीषण आग (Virar Fire) लागली. या आगीमध्ये आठ ते 10 दुकानं जळून खाक झाली. शुक्रवारी मध्यरात्री साडे बाराच्याच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी फर्निचर (Wooden Furniture) आणि कापसाच्या गाद्या असल्याने काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं. बघता बघता सर्व दुकानें जळून खाक झाली होती. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदरची दुकाने ही रस्त्याच्या कडेला होती. त्याशेजारी रहिवाशी इमारतीदेखील होती. दुकानं आणि इमारती यांच्या अंतरामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. वसई विरार महानगर पालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बचावकार्य सुरू केलं. एकूण 30 जवान आणि 4 पाण्याचे बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं होतं. त्यानंतर तातडीनं कुलिंग ऑपरेशनचं कामही हाती घेण्यात आलं होतं.

आग आटोक्यात, पण लाखोचं नुकसान

सदरची दुकाने बेकायदेशीर असून या ठिकाणी अग्नीसुरक्षा रोधक कोणत्याही यंत्रणा नव्हत्या. यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. प्रथमदर्शनी सदरची आग ही शॉर्टसर्किटने लागली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. सदरच्या दुकानात कुणी मजूर अथवा कारागीर राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

ही आग भडकल्यानंतर रस्त्यावर आगीचे प्रचंड लोट पसरले होते. शिवाय दूरवरुन या आगीची तीव्रता कळून येत होती. या आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे ही आग तत्काळ आटोक्यात आणण्यात यश आलंय.

कशामुळे लागली आग?

रात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात फर्निचरचं सामान आगीत जळून खाक झालं आहे. परिणामी मोठं आर्थिक नुकसान झालंय. घरात वापरल्या जाण्याच्या फर्निचरचं सामान या गोडाऊनमध्ये होतं. ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलंय. कचरा टाकल्यानं आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शंका सामाजिक कार्यकर्ते झहीर शेख यांनी व्यक्त केली. रात्रीच्या वेळी गोडाऊनमध्ये कुणीही कामगार नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.