Ladakh Accident : 4 वर्षाच्या जुळ्या मुली, 15 दिवसांपूर्वी सुट्टीवरुन कर्तव्यावर परतले, सातारच्या विजय शिंदेना लडाखमध्ये वीरमरण

या अपघाताने देशासह महाराष्ट्रावरही सध्या शोककळी पसरली आहे. आपले जवान आपल्या रक्षणासाठी सीमेवर जिवाचं रान करुन लढत असताता. मात्र अशी एखादी घटना सर्वाच्याच मनला चटका लावून जाते. सध्या विजय यांच्या जाण्याने साताऱ्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ladakh Accident : 4 वर्षाच्या जुळ्या मुली, 15 दिवसांपूर्वी सुट्टीवरुन कर्तव्यावर परतले, सातारच्या विजय शिंदेना लडाखमध्ये वीरमरण
सातारच्या विजय शिंदेना लडाखमध्ये वीरमरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:50 PM

लडाख : आज लडाखमध्ये झालेल्या अपघातानं (Ladakh Accident) देशाचं कधीच न भरून निघणारं नुकसान केलंय. लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन (Indian Army Vehicle Accident) श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Vijay Shinde) यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. या अपघाताने देशासह महाराष्ट्रावरही सध्या शोककळी पसरली आहे. आपले जवान आपल्या रक्षणासाठी सीमेवर जिवाचं रान करुन लढत असताता. मात्र अशी एखादी घटना सर्वाच्याच मनला चटका लावून जाते. सध्या विजय यांच्या जाण्याने साताऱ्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांची कारकिर्द

विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते. तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पैरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह-लडाख येथे होते. लष्करात ते सुभेदार या पदावर कार्यरत होते. 26 जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास पडले. या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि सोळा जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

रविवारी पार्थिव आणणार

विजय शिंदे यांचे पार्थिव रविवार 29 मे रोजी विसापूर ता. खटाव येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार होणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांना निरोप देण्यासाठी या परिसरातून मोठ्या प्रमाणात जनसागर लोटणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरातील जवानही अपघातात शहीद

याच अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशांत जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. शहीद प्रशांत जाधव यांचे पार्थिव उद्या खास विमानाने बेळगांव येथे आणण्यात येणार असून बसर्गेत त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रशांत यांचे लग्न जानेवारी 2020 मध्ये झाले होते . त्यांना एक वर्षाची मुलगी ही आहे, आता जाधव कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखामुळे संपूर्ण परिसरता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.