Mumbai Electricity : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक!

Mumbai Electricity : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक लागू शकतो. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी, गेल्या पाच वर्षांतील वीजेच्या दराचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार, वीज कंपन्या नवीन वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करतात.

Mumbai Electricity : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक!
दरवाढी घाम काढणार
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 8:06 PM

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Electricity Prices Hike) लागू शकतो. मुंबईत वीज दरवाढीचा झटका लागू शकतो. यंदा वीज दरात वाढीचा (1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024) आणि पुढील वर्षी कपातीचा प्रस्ताव (1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025) प्रस्तावित आहे. या प्रस्तावावर आज, 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. जर या प्रस्तावावर हरकती घेण्यात आल्या नाहीत तर वीज दरवाढ अटळ आहे. मुंबईत (Mumbai) तीन वीज कंपन्यांच्या प्रस्तावित वीज दरवाढीविषयी सुनावणी झाली आहे. या सुनावणीत सहभागी मुंबईकरांना गुरुवारपर्यंत हरकती नोंदविता येणार होत्या. कंपन्या 1 एप्रिलपासून प्रस्तावित वीज दरवाढ लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या विद्युत वितरण कंपन्यांची 1 एप्रिल 2020 रोजीपासून पंचवार्षिक विद्युत शुल्क निश्चिती सुरु झाली. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी, गेल्या पाच वर्षांतील वीजेच्या दराचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार, वीज कंपन्या नवीन वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करतात. आता जर हरकती आल्या नाहीत तर मात्र मुंबईकरांसाठी दरवाढ अटळ आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.

या प्रस्तावात तीन वीज वितरण कंपन्यांनी वर्ष 2024-25 मध्ये वीज दरात अजून कपात करण्याची सूचना केली आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या श्रेणीत, अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023-24 साठी 2 ते 7 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण 2024-25 या कालावधीसाठी कंपनीने वीज दरात 3 आणि 4 टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. टाटा पावरने 2023-24 या चालू वर्षासाठी 10 ते 30 टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर 2024-25 या वर्षाकरीता 6 ते 7 टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत वीज वितरण करण्यासाठी तीन कंपन्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड( Adani Electricity Mumbai Limited), टाटा पावर आणि बेस्ट इंटरप्राइजेस यांचा समावेश आहे. या तीनही वीज वितरण कंपन्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला दरवाढीचा प्रस्ताव सोपवला आहे. या प्रस्तावावर आयोगासमोर ऑनलाईन सुनावणी झाली आहे. ही सुनावणी या सोमवारी संपली.

बेस्टने 2023-24 आणि 2024-25 यावर्षासाठी घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. बेस्टने वीज शुल्क कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. वर्ष 2023-24 मध्ये सरासरी 7.33 टक्के शुल्क कपात तर वर्ष 2024-25 मध्ये सरासरी 1.10 टक्क्यांची कपात प्रस्तावित आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडे सध्या मुंबईतील 30 लाख ग्राहक आहेत. तर टाटा पावरकडे 8 लाख ग्राहक आहेत. बेस्टकडे साडेदहा लाख ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याची जबाबदारी आहे. महावितरणकडे राज्यातील इतर शहरांमध्ये वीज वितरणाची जबाबदारी आहे. महावितरण कंपनीने 2023-24 या वर्षासाठी 37 टक्के आणि 2024-25 या वर्षासाठी 14 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.

महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीसंदर्भात मंगळवारी नवी मुंबईत सुनावणी सुरु झाली. महावितरणद्वारे 23 फेब्रुवारीला पुण्यात सुनावणी सुरु झाली. 25 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद, 27 फेब्रुवारी रोजी नाशिक, 2 मार्च रोजी अमरावती तर 3 मार्च रोजी नागपूर येथे सुनावणी होईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.